विजय मल्ल्याच्या व्हिलाचा १९ ऑक्टोबरला होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 08:01 PM2016-09-13T20:01:13+5:302016-09-13T20:02:27+5:30

कांना ९ हजार कोटी रुपयांहून अधिक देणे असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा कांदोळी येथील व्हिला येत्या १९ ऑक्टोंबर रोजी इ लिलावात विकला जाणार आहे.

Vijay Mallya's villa will be held on October 19 | विजय मल्ल्याच्या व्हिलाचा १९ ऑक्टोबरला होणार लिलाव

विजय मल्ल्याच्या व्हिलाचा १९ ऑक्टोबरला होणार लिलाव

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत  
पणजी, दि. १३ -  बँकांना ९ हजार कोटी रुपयांहून अधिक देणे असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा कांदोळी येथील व्हिला येत्या १९ ऑक्टोंबर रोजी इ लिलावात विकला जाणार आहे. या व्हिलाची प्राथमिक बोली ८५ कोटी रुपये निश्चित झालेली आहे. 
मल्ल्या यांनी कर्ज थकविल्याने गेल्या मे महिन्यात भारतीय स्टेट बँकेने हा व्हिला ताब्यात घेतला होता. मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने ९ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. युनायटेड ब्रिवरीजच्या नावाने हा व्हिला आहे. उत्तर गोव्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांनी 
आदेश दिल्यानंतर बँकेने या व्हिलाचा ताबा घेतला. त्याआधी कूळ हक्काचा दावा करुन तो ताब्यात देण्यास कंपनीने नकार दिला होता. १२ मे रोजी अखेर बँकेने त्यावर ताबा मिळविला. 
मल्ल्या एकेकाळी कांदोळीच्या या व्हिलामध्ये जंगी पार्ट्या आयोजित करीत असे. बँकेने गेल्या मार्चमध्ये मुंबईतील किंगफिशर हाउस विकण्याचा प्रयत्न केला होता. १५0 कोटींची प्राथमिक बोल लावण्यात आली होती परंतु कोणीही खरेदीसाठी पुठे आले नाही. 
एप्रिलमध्ये किंगाफिशर एअरलाइन्स ब्रॅण्ड व ट्रेडमार्क लिलांवात काढण्याचा प्रयत्न झाला. त्याची प्राथमिक बोली ३६७ कोटी रुपये होती. मात्र तोही फ्लॉप शो ठरला. कोणीही खरेदीसाठी पुढे आले नाही. गोव्यातील हा व्हिला पर्यटक नकाशावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक प्राप्त केलेल्या कांदोळी किना-यावर असल्याने १९ ऑक्टोबरच्या लिलांवाला किती प्रतिसाद मिळतो पहावा लागेल.

Web Title: Vijay Mallya's villa will be held on October 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.