आता मलायका-अरबाज खान होणार वेगळे?

By Admin | Published: January 30, 2016 09:27 AM2016-01-30T09:27:01+5:302016-01-30T10:00:53+5:30

बॉलिवूडमधील हॉट कपल अरबाज खान- मलायका अरोरा हे दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे.

Will Malaika-Arbaaz Khan be different now? | आता मलायका-अरबाज खान होणार वेगळे?

आता मलायका-अरबाज खान होणार वेगळे?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेक-अपचा काळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रणबीर-कतरिना, फरहान अख्तर-अधुना यांनी वेगळे होण्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल "अरबाज खान- मलायका अरोरा" हे सेपरेशनच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांच्या दरम्यान सध्या बरेच तणावाचे वातावरण असून ते दोघेही विभक्त होणार असल्याते वृत्त स्पॉटबॉय.कॉमने दिले आहे. 
या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका-अरबाज सध्या एकत्र रहात नसून मलायका तिच्या मुलासह खारमधील एका इमारतीत शिफ्ट झाली आहे. गेल्या १७ वर्षांपासून विवाहीत असलेले अरबाज आणि मलायका हे दोघेही 'पॉवर कपल' हा रिअॅलिटी शो होस्ट करत होते, मात्र ब-याच दिवसांपासून मलायका या शोमध्ये दिसलेली नाही. तसेच अरबाजची बहीण अर्पिता हिच्या दुबईतील 'बेबी शॉवर'साठीही ती उपस्थित नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, अरबाज-मलायकामध्ये ब-याच काळापासून खटके उडत होते आणि सध्या मलायका युकेमधील एका उद्योगपतीला डेट करत आहे. पण मलायका आणि अरबाजने याप्रकरणी अद्याप आपले मौन काही सोडलेले नाही. 

Web Title: Will Malaika-Arbaaz Khan be different now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.