सचिन आणि कोहलीच्या तुलनेवर लता मंगेशकर नाराज

By Admin | Published: March 31, 2016 12:35 PM2016-03-31T12:35:41+5:302016-03-31T14:02:04+5:30

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीची ही तुलना आवडलेली नाही, ट्विटरच्या माध्यमातून आपली ही नाराजी व्यक्त केली आहे

Lata Mangeshkar upset with Sachin and Kohli | सचिन आणि कोहलीच्या तुलनेवर लता मंगेशकर नाराज

सचिन आणि कोहलीच्या तुलनेवर लता मंगेशकर नाराज

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ३१ - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली हा सध्याचा चर्चैचा विषय झाला आहे. विराट कोहली सध्या त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. सचिन तेंडूलकरने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा कोण घेईल याबाबत क्रिकेरसिकांच्या मनात शंका होती. मात्र विराट कोहली सध्या ज्याप्रकारे खेळत आहेत ते पाहता लवकरच तो सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करेल अशी अनेकांनी अपेक्षा आहे. खुद्द सचिन तेंडूलकरने एका कार्यक्रमात विराट कोहली माझा रेकॉर्ड तोडेल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीची ही तुलना आवडलेली नाही.
 
लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. 'नमस्कार आज बातम्यांमध्ये क्रिकेटबद्दल खुप काही सांगितलं जात आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांची तुलना केली जाते ही गोष्ट मला आवडलेली नाही. हे दोघेही आपापल्या जागेवर मोठे खेळाडू आहेत. सचिनची तुलना कोणाशीच केली गेली नाही पाहिजे. विराटचं भविष्य उज्ज्वल आहे यात कोणताही शंका नाही. मात्र सचिनचा खेळ ही एक तपस्या आहे', असं लता मंगेशकर यांनी लिहिलं आहे. 
 
लता मंगेशखर सचिनच्या खुप मोठ्या फॅन आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपलं सचिनवरचं प्रेम बोलून दाखवलं आहे. सचिन तेंडुलकर आणि माझं खूप जिव्हाळ्याचं नात असल्याचं लता मंगेशकर वेळोवेळी सांगतात. सचिनला आपला मानसपुत्र म्हणणा-या लता मंगेशकरांचा सचिनने एका कार्यक्रमात आई असा उल्लेखदेखील केला होता. 
 

Web Title: Lata Mangeshkar upset with Sachin and Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.