'द जंगल बुक' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 11:01 AM2016-04-05T11:01:10+5:302016-04-05T11:06:07+5:30

सेन्सर बोर्डाने मात्र हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'ला युए सर्टिफिकेट दिले आहे

'The Jungle Book' film U / A certificate | 'द जंगल बुक' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट

'द जंगल बुक' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' हे गाणं ज्याप्रमाणे अजूनही अनेकांच्या लक्षात आहे त्याचप्रमाणे त्यातील मोगली हे पात्र आजही अनेकांना आकर्षित करत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत प्रत्येकाच्या यासंबंधी काही ना काहीतरी आठवणी आहेत. बालपणीच्या आठवणी जागे करणारा मोगली पुन्हा हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'च्या निमित्ताने पुन्हा रुपेरी पडद्यावर येतं आहे. सेन्सर बोर्डाने मात्र हॉलीवूड चित्रपट  'द जंगल बुक'ला युए सर्टिफिकेट दिले आहे. 
 
सेन्सर बोर्डाने हॉलीवूड चित्रपट  'द जंगल बुक'ला युए सर्टिफिकेट दिल्याने अनेकांनी भुवया उंचवल्या आहेत. 'पुस्तकाच्या आधारे तुम्ही विचार करु नका. चित्रपट पाहा आणि त्यानंतर मुलांनी एकटे पाहणे योग्य आहे की नाही ? हे ठरवा. थ्रीडी एफेक्टमुळे प्राणी प्रेक्षकांमध्येच उडी मारत आहेत असा भास होत असल्याने मुलं घाबरण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं संपुर्ण पॅकेजिंग पाहूनच हा निर्णय घेतला', असल्याची माहिती सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली आहे. 
 
'युए सर्टिफिकेटचा चुकीचा अर्थ लावला जात असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं निहलानी यांनी सांगितलं आहे. युए सर्टिफिकेटमुळे पालकांना चित्रपटाबद्द्ल कल्पना येते त्यामुळे मुलांना चित्रपटाला पाठवायचे की नाही ? ठरवता येते. चित्रपट न पाहता पालकांना कसं काय कळेल की चित्रपटात काय आहे ? त्यासाठीच युए सर्टिफिकेट असल्याचं', पहलाज निहलानी यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: 'The Jungle Book' film U / A certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.