जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानेही घेतली 'सैराट'ची दखल

By Admin | Published: May 16, 2016 09:25 AM2016-05-16T09:25:46+5:302016-05-16T09:32:54+5:30

ऑनर किलिंगसारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करुन चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं असताना जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने देखील 'सैराट' चित्रपटाची दखल घेतली आहे

The world-famous 'Forbes' magazine also took 'Serrat''s intervention | जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानेही घेतली 'सैराट'ची दखल

जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानेही घेतली 'सैराट'ची दखल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि, 16 - बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणा-या 'सैराट' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑनर किलिंगसारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करुन चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं असताना जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने देखील 'सैराट' चित्रपटाची दखल घेतली आहे. 
 
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट चित्रपटाने तीन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरला आहे. जातव्यवस्थेवर भाष्य करणारा दुर्मिळ चित्रपट असल्याचं फोर्ब्सने म्हटलं आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आला होता ज्यामध्ये चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं होतं. 
 
आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे. मेनस्ट्रीम गाणी आणि डान्स असतानादेखील चित्रपट कठोर विषयावर भाष्य करत भिडतो असे कौतुक फोर्ब्सने केलं आहे.
 
फोर्ब्सने रिंकू राजगुरुच्या व्यक्तिरेखेचंदेखील कौतुक केलं आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्री ज्या गोष्टी करण्यासाठी घाबरतात अशा गोष्टी आर्चीने केल्या आहे. चित्रपटात आर्ची परश्याला पोलिसांपासून सोडवते, बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींकडून सुटका करवून घेतील का ? असं म्हणत फोर्ब्सने बॉलिवूडमधील हिरो कल्चरवर टीका केली आहे.
 
मराठी चित्रपटांची कमाई - 
नटसम्राटने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. दुसरीकडे कट्यार काळजात घुसली या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या लय भारीने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता.

Web Title: The world-famous 'Forbes' magazine also took 'Serrat''s intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.