भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : महेश भट्ट
By admin | Published: June 8, 2016 06:27 PM2016-06-08T18:27:17+5:302016-06-08T18:27:17+5:30
सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डातून ( सीबीएफसी) काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
Next
>ऑनलाइन लोमकत
मुंबई, दि. ८ : 'उडता पंजाब' या चित्रपटातील सेन्सॉर बोर्डाने ८९ कट्स सुचवल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील वाद चिघळला गेला. शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाकण्याचीही सूचना केली आहे. तसेच राजकारण व निवडणुकीचेही संदर्भ काढण्यास सांगितले आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे चित्रपट दिगदर्शक भलतेच संतापले असून आज मुंबईमध्ये एकत्र येवून त्यांनी पत्रकार परिषेदेद्वारे आपली नारी व्याकत केली. त्यावेळी बोलताना महेश भट्ट यांनी सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी यांच्यावर असा आरोप केला ते म्हणाले भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डातून ( सीबीएफसी) काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही या मुद्यावर नाराजी व्यक्त करताना, "मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील. पण मला आता विमान पकडायची गरज नाही. कारण इथे तेच अनुभवयास मिळत आहे," अशा संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मी कधीच म्हणालो नाही की 'उडता पंजाब' पंजाबमध्ये रिलीज करू नका, सिनेमातील काही दृश्य वगळून पास करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे सीबीएफसी कोणतही राजकारण करत नाही. मी कोणतही व्यक्तिगत वक्तव्य केलं नाही, अनुराग कश्यप व्यक्तिगत वक्तव्य करत आहेत असे मत सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी यांनी व्यक्त केले आहे.
'उडता पंजाब' आणि सेन्सॉर बोर्डावर दिग्गजांच्या प्रतिक्रिया -
- मला याविषयी फारशी माहिती नाही, मात्र क्रिएव्हीटीला मारू नका - अमिताभ बच्चन
- प्रेक्षकांना काय पाहायचे आहे हे त्यांना स्वतःलाच ठरवू द्या : राहुल ढोलकिया
- एक व्यक्ती संपूर्ण देशाची नैतिकता ठरवू शकत नाही : अनुराग कश्यप
- ड्रग्जची समस्या सर्वांना माहित असणे गरजेचे, चित्रपटातून जो संदेश देण्यात आला आहे त्याचं आपण सर्वांनी समर्थन करायला हवं - शाहिद कपूर
- उडता पंजाब चित्रपटाविरोधात बॉलिवूड एकवटले, पत्रकार परिषदेत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलात निहलानी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
- पंजाबच्या ड्रग्जची समस्या सर्व जाणतात मग चित्रपटाबद्दल अचानाक हंगामा कशासाठी - सतिश कौशिक