लडता पहलाज..! 'उडता पंजाब'च्या वादावर 'अमुल'ची मार्मिक टिप्पणी
By Admin | Published: June 9, 2016 09:20 AM2016-06-09T09:20:08+5:302016-06-09T11:13:33+5:30
उडता पंजाब चित्रटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'अमूल'ने कार्टूनच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - पंजाब राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे कारण देत, सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब चित्रपटाचे नाव व त्यातील दृश्यांवर आक्षेप घेत त्यावर कात्री चालवल्याच्या निर्णयावर खूप टीका होत असून सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शकांच्या पाठीमागे संपूर्ण बॉलिवूड उभे राहिले असून दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, आमिर खान यांनीही याप्रकरणी आपले विचार नोंदवत घडलेला प्रकार योग्य नसल्याचे नमूद केले आहे.
समाजातील आर्थिक, क्रीडा क्षेत्र तसेच अनेक महत्वाच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणा-या ' अमूलची कार्टून्स' खूप लोकप्रिय असून त्यातून दिल्या जाणा-या संदेशांचे सर्व स्तरातूनच कौतुक होत असते. याच अमूलने उडता पंजाब वादावरही आपल्या कार्टूनच्या माध्यमातून टिप्पणी केली आहे. 'लडता पहलाज' या शीर्षकाखालील कार्टूनमध्ये अवघ्या काही रंग-रेषांच्या फटका-यांत संपूर्ण वादावर टिप्पणी करण्यात आली असून त्याला नेटक-यांचीही चांगलीच पसंती मिळाली आहे.
#Amul Topical: Film on drug menace runs into controversy. pic.twitter.com/D9C6YfGjHK
— Amul.coop (@Amul_Coop) June 8, 2016