'सैराट' दक्षिणेकडे सुसाट, ४ भाषेत होणार रिमेक
By Admin | Published: June 12, 2016 09:21 AM2016-06-12T09:21:20+5:302016-06-12T18:47:34+5:30
८५ कोटींची कमाई करत १०० कोटीं कमाई करण्याचा पहिला मान मिळवण्यासाठी वाटचाल सुरु झाली आहे. तिकिटबारीवर सुसाट सुटलेला सैराटची स्वारी आता दक्षिणेकडे वळीली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत सैराट या चित्रपटाने ८५ कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. पाच आठवड्यांत ८५ कोटींची कमाई करत १०० कोटीं कमाई करण्याचा पहिला मान मिळवण्यासाठी वाटचाल सुरु झाली आहे. तिकिटबारीवर सुसाट सुटलेला सैराट आता मराठी व्यतिरिक्त अन्य ४ भाषेतही तयार होणार आहे.
सैराटची निर्मीती झी टॉकिजने केली होती. झीने काल रात्री सैराट चित्रपट अन्य ४ प्रादेशिक भाषेत तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.कमाईत विक्रम करत असताना आता हा सिनेमा दक्षिणेकडील तीन प्रादेशिक भाषेत सिनेमा काढण्यात येणार आहे. तमीळ, मल्यालम, तेलगू आणि कन्नड या भाषेत झी टॉकीज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेय. त्यामुळे मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच तीन प्रादेशिक भाषेत मराठी सिनेमा दुसऱ्या भाषेत डबींग होत आहे.
सैराट हा सिनेमा २९ एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे. २९ एप्रिल रोजी सैराट राज्यभरातील ४०० थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो ८५०० ते १४००० पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री १२ आणि पहाटे ३ चा शोही सुरु होता. सैराटचं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.
आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. सैराट ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट चित्रपटाने तीन आठवडय़ांत ४० कोटींची कमाई केली होती. सैराटने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरले आहे.