‘देवदास’च्या भूमिकेतील मंगेशचा फर्स्ट लूक

By Admin | Published: August 3, 2016 02:30 AM2016-08-03T02:30:56+5:302016-08-03T02:30:56+5:30

शरदचंद्र चटोपाध्याय या बंगाली लेखकाच्या देवदास या कादंबरीवर दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५५मध्ये देवदास हा चित्रपट बनवला होता.

Mangesh's First Look in the role of 'Devdas' | ‘देवदास’च्या भूमिकेतील मंगेशचा फर्स्ट लूक

‘देवदास’च्या भूमिकेतील मंगेशचा फर्स्ट लूक

googlenewsNext


शरत्चंद्र चटोपाध्याय या बंगाली लेखकाच्या देवदास या कादंबरीवर दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५५मध्ये देवदास हा चित्रपट बनवला होता. दिलीपकुमार यांनी साकारलेला देवदास आजही आपण विसरू शकत नाही. २००२मध्ये संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एकदा देवदास हा चित्रपट बनवला. शाहरूखनेही देवदासच्या भूमिकेत जीव ओतला. आता दिग्दर्शक ऋतुराज धलगुडे मराठीत देवदास घेऊन येत आहेत. या मराठी चित्रपटात देवदासची भूमिका मंगेश देसाईला साकारण्याची संधी मिळाली आहे.
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये तुझे लग्न हेच माझे स्वप्न होते... पण त्या स्वप्नात मी मलाच पाहायला विसरून गेलो... हा संवाद देवदासच्या तोंडून ऐकायला मिळतोय. पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये धबधब्याच्या किनारी बसलेला देवा या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक ऋतुराज धलगुडे याच्याशी या चित्रपटासंदर्भात संवाद साधला असता तो म्हणाला, ‘‘देवदास हा चित्रपट याआधी १६ ते १७ भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. मराठीत आपण देवदास करूयात असा विचार माझ्या मनात आला आणि मी त्याबद्दल मंगेशला सांगितले. या चित्रपटातील देवदास हा खूपच बोलका आणि विचार करणारा, व्यक्त होणारा आहे. मला या चित्रपटासाठी सशक्तअभिनेता हवा होता आणि त्या वेळी माझ्या डोक्यात फक्तमंगेशचेच नाव आले.
देवदासची शोकांतिका, त्याच्या डोळ्यांतील हावभाव, दु:ख मंगेश अगदी योग्य दाखवू शकतो याचा मला विश्वास होता. आम्ही काही दृश्यांचे शूटिंग केले असून, २०१७पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा आमचा विचार असल्याचे ऋतुराजने सांगितले. मंगेश देसाईचा देवदासच्या भूमिकेतील हा एक्सक्लुझिव्ह फोटोदेखील ऋतुराजने सीएनएक्सशी शेअर केला आहे.

Web Title: Mangesh's First Look in the role of 'Devdas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.