'ए दिल...' प्रदर्शित करू नका - मनसेची मल्टिप्लेक्स मालकांना तंबी
By Admin | Published: October 17, 2016 02:58 PM2016-10-17T14:58:53+5:302016-10-17T16:08:07+5:30
मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना पत्र लिहून, 'ए दिल है मुश्किल सिनेमा प्रदर्शित करू नका, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ' असा इशारा दिला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार कायम आहे. सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने हा सिनेमा अडचणीत सापडला आहे. उरी हल्ल्यानंतर 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना पत्र लिहून, 'ए दिल है मुश्किल सिनेमा प्रदर्शित करू नका, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ' असा इशारा दिला आहे. मनसेच्या अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स मालकांना हा इशारा दिला आहे.
आणखी बातम्या
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांचा अल्टिमेटम देत भारत सोडायला सांगितले होते. यानंतर पाकिस्तान कलाकारांचा सहभाग असलेले बॉलिवूडचे सिनेमे प्रदर्शित करण्यावरही आक्षेप घेत पाक कलाकारांचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही म्हटले होते. तसेच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशननेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे. तर नुकतेच, सिनेमा ऑनर्स आणि एक्झिबिटर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा दाखवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
आणखी बातम्या