'ए दिल...' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे भूमिकेवर ठाम

By Admin | Published: October 18, 2016 03:39 PM2016-10-18T15:39:41+5:302016-10-18T16:05:26+5:30

'ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही',अशी भूमिका मनसेचे अमेय खोपकर यांनी पुन्हा मांडली आहे.

'A heart ...' will not be displayed, MNS speaks against role | 'ए दिल...' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे भूमिकेवर ठाम

'ए दिल...' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे भूमिकेवर ठाम

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - 'ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही',अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा मांडली आहे. 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यासंदर्भातील हे आंदोलन आहे', असेही त्यांनी सांगितले आहे.
 
मात्र, 'ए दिल है मुश्किल' प्रदर्शित करणा-या सिनेमागृहांना सुरक्षा पुरवणार असल्याचे आश्वासन मुंबई पोलिसांनी सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहरला दिले आहे. यावरही अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही नेहमी मुंबई पोलिसांसोबत आहोत,मात्र पाकिस्तानी कलाकार असलेल्या सिनेमाला पोलीस सुरक्षा पुरवणार असल्याची बाब लाजिरवाणी आहे', असेही अमेय खोपकर म्हणाले आहे. 
 
आणखी बातम्या
'ए दिल...' प्रदर्शित करू नका - मनसेची मल्टिप्लेक्स मालकांना तंबी
महेश भट्ट मूर्ख असून ते भारतीय नाहीत - अमेय खोपकर
पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय
 
'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकर फवाद खान असल्यामुळे सिनेमा अडचणीत आला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या बॉलिवूडमधील सिनेमांनाही विरोध करत संबंधित सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेही घेतली आहे. 
 

Web Title: 'A heart ...' will not be displayed, MNS speaks against role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.