सूनबाईच्या 'बोल्ड' फोटोंवर अमिताभ नाराज
By Admin | Published: October 19, 2016 01:59 PM2016-10-19T13:59:02+5:302016-10-19T14:29:54+5:30
रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनच्या हॉट फोटोंमुळेही सर्वत्र चर्चेत आहे. ऐश्वर्या रायचे हेच हॉट फोटो बच्चन कुटुंबाला खटकले असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे.
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - 'ऐ दिल है मुश्कील' चित्रपट अन्य वादांबरोबर रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनच्या हॉट फोटोंमुळेही सर्वत्र चर्चेत आहे. ऐश्वर्या रायचे हेच हॉट फोटो बच्चन कुटुंबाला खटकले असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी 'ए दिल है मुश्किल'बद्दल साधे एक टि्वटही केलेले नाही. त्यावरुन अमिताभ नाराज असल्याची अटकळ बांधली जात आहे.
अमिताभ स्वत: सोशल मिडियावरुन बच्चन कुटुंबाशी संबंधित चित्रपटांचे प्रमोशन करतात. पण ए दिल है मुश्किलबद्दल त्यांनी मौन धारण केले आहे. अॅश आणि रणबीरमधील प्रणय दृश्यांना बच्चन कुटुंबाचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आजपर्यंत बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याने याबद्दल भाष्य केलेले नाही.
आणखी वाचा
अॅशचे हे बोल्ड पाऊल अमिताभ यांना आवडले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांनी जझबा, सरबजीत या चित्रपटांच्यावेळी ऐश्वर्याला पाठिंबा दिला होता. उतारवयाकडे झुकलेले असताना अमिताभ यांनी स्वत: निशब्द, बूम चित्रपटातून बोल्ड भूमिका केल्या आहेत. अमिताभ यांनी करण जोहरला चित्रपटातून बोल्ड दृश्य हटवण्यास सांगितल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी कलाकारांना होत असलेल्या विरोधामुळे हा चित्रपट आधीच इतक्या अडचणीत सापडलेला असताना करण जोहर बिग बींची ही मागणी पूर्ण करतो का ? ते आता लवकरच समजेल.