बर्थडे स्पेशल : जाणून घ्या हृतिकबद्दलच्या 10 गोष्टी

By Admin | Published: January 10, 2017 10:51 AM2017-01-10T10:51:07+5:302017-01-10T12:19:31+5:30

ह्रतिकचा जन्म पंजाबी हिंदू परिवारात 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला. प्रसिद्ध अभेिनेते, निर्माते राकेश रोशन हे त्याचे वडिल आहेत. जाणून घेऊयात ह्रतिक रोशनबद्दलच्या 10 गोष्टी

Birthday Special: Know 10 things about Hritik | बर्थडे स्पेशल : जाणून घ्या हृतिकबद्दलच्या 10 गोष्टी

बर्थडे स्पेशल : जाणून घ्या हृतिकबद्दलच्या 10 गोष्टी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - बॉलिवूडचा सुपरहिरो असलेल्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. कहो ना प्यार है! चित्रपटापासूनच त्याने प्रक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. क्रिश, धूम 2, जिंदगी न मिलेगी दोबारा, जोधा अकबर आणि लक्ष्य यासारखे हिट चित्रपट देत त्याने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला आहे.
हृतिकचा जन्म पंजाबी हिंदू परिवारात 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला. प्रसिद्ध अभेनेते, निर्माते राकेश रोशन हे त्याचे वडिल आहेत. जाणून घेऊयात हृतिक रोशनबद्दलच्या 10 गोष्टी.
 
1. ह्रतिक रोशनने बालकलाकार म्हणून आशा (1980), आपके दीवाने (1980) आणि भगवान दादा (1986) मध्ये काम केलं आहे. 
 
2. ह्रतिकचे खरे आडनाव हे रोशन नसून नागरथ आहे. 
 
3.  ह्रतिकला आशा चित्रपटात डान्स करण्यासाठी 100 रुपयांचे मानधन मिळाले होते. 
 
4. ह्रतिक रोशनचे टोपणनाव डुग्गु आहे. 
 
5. कहो ना प्यार है चित्रपटात मुख्यभुमिका करण्यापुर्वी त्याने 'कोयला' आणि 'करण अर्जून'ला आपल्या वडिलांना असिस्ट केलं होतं.  
 
6. कहो ना प्यार है चित्रपटासाठी राकेश रोशन यांनी शाहरुख खानला मुख्य भुमिकेसाठी घेतले होते, पण पटकथा न आवडल्यामुळे शाहरुख खाने चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राकेश रोशन यांनी आपल्या ह्रितिकला लाँच करण्याचा निर्णय घेतला.
 
7. हृतिकला लहानपणी अडकळत बोलण्याची सवय होती, टेन्शन आल्यावर तर ते प्रमाण आणखीनच वाढायचं. पण स्पीच थेरेपीच्या मदतीने त्याने या दुबळेपणावर मात केली.
 
8. मुलीमध्ये ह्रतिकची सर्वाच जास्त क्रेज आहे. २००० साली त्याचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला व्हॅलेंटाऊन डेला 30,000 पेक्षा अधिक लग्नाचे प्रस्ताव आले होते. लहानपणी त्याचा क्रश होत्या अभिनेत्री मधुबाला आणि परवीन बाबी..
 
9. ह्रतिक रोशन काही दिवसांपासून मेकअपसाठी एकाच आरश्याचा वापर करत आहे. त्याचा मेकअप करणारा तो आरसा सतत आपल्या सोबत ठेवतोय.
 
10. हृतिकने नुकतेच जगातील सर्वात हॅण्डसम पुरूषांच्या यादीत तिस-या क्रमांकावर स्थान मिळवले. या यादीत त्याने दबंग स्टार सलमान खानलाही मागे टाकले. यादीत पहिल्या स्थानावर 'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रूझ तर 'ट्वयलाईट' फेम अभिनेता रॉबर्ट पॅटिसन दुस-या स्थानावर आहे. 

 

Web Title: Birthday Special: Know 10 things about Hritik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.