सलमानच्या 'ट्युबलाइट'मध्ये शाहरूखची एन्ट्री

By Admin | Published: January 11, 2017 03:23 PM2017-01-11T15:23:08+5:302017-01-11T15:55:15+5:30

शाहरुख आणि सलमान 'ट्यूबलाईट' सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ट्युबलाईटमध्ये शाहरुख खास भूमिकेत असणार आहे. ओम शांती ओमनंतर दोघे सुपरस्टार एकत्र येत आहेत.

Shahrukh's entry in Salman's Tubalite | सलमानच्या 'ट्युबलाइट'मध्ये शाहरूखची एन्ट्री

सलमानच्या 'ट्युबलाइट'मध्ये शाहरूखची एन्ट्री

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि बादशाह शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. लवकरच हे दोघंही एकत्र सिल्व्हर स्क्रिनवर पाहायला मिळणार आहेत. सलमानचा आगामी सिनेमा 'ट्युबलाइट' मध्ये शाहरूख खान एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. 'ट्युबलाइट'मध्ये शाहरुख पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
यापूर्वी सलमान आणि शाहरूख फराह खानच्या 'ओम शांती ओम' सिनेमामध्ये शेवटचे एकत्र दिसले होते. तब्बल 10 वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरूख खान 'ट्युबलाइट' सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी 'ट्युबलाइट' सिनेमामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा दिसणार असल्याची चर्चा होती.  मात्र, आता शाहरुख खानच सिनेमात विशेष भूमिकेत दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे. 
ट्युबलाइट सिनेमापूर्वी, सलमान आणि शाहरुखने 'हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ होता है आणि करण-अर्जुन' सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे.
(अभिषेकने उडवली सलमानची खिल्ली, अॅशला आवरेना हसू)
हल्ली या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से समोर येत आहेत.  2016 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रईस आणि सुलतान हे सिनेमे बॉक्सऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार असल्याचीही बातमी आली होती. मात्र शाहरुखने आपल्या 'रईस' सिनेमाची तारीख पुढे ढकलली. सलमानची बहिण अर्पिताच्या विवाहसोहळ्यात दोघांच्या मैत्रीचे सूर पुन्हा जुळल्यानंतर आता दोघंही एकमेकांसोबत 'तुझ्यासाठी कायपण' अशा पद्धतीने वागत असल्याचे दिसत आहेत. 
(सखाराम बाईंडर'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे)
असो, सलमान आणि शाहरुखच्या वाढत्या मैत्रीच्या गोडव्याने कुणी खूश होवो किंवा न होवो, मात्र त्यांचे चाहते सध्या भलतेच खूश दिसत आहेत.

 

Web Title: Shahrukh's entry in Salman's Tubalite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.