सुहानाच्या लव्हस्टोरीत शाहरूखचं 7 कलमी विघ्न

By Admin | Published: January 12, 2017 01:59 PM2017-01-12T13:59:25+5:302017-01-12T14:09:39+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची मुलगी सुहानासोबत मैत्री करणं, तिला पटवणं किंवा तिच्याशी जवळीक वाढवणं कोणत्याही मुलासाठी सोपे नसणार, हे किंग खानने स्पष्ट केले आहे.

Shahrukh Khan's 7-Point Burden | सुहानाच्या लव्हस्टोरीत शाहरूखचं 7 कलमी विघ्न

सुहानाच्या लव्हस्टोरीत शाहरूखचं 7 कलमी विघ्न

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची मुलगी सुहानासोबत मैत्री करणं, तिला पटवणं किंवा तिच्याशी जवळीक वाढवणं कोणत्याही मुलासाठी सोपे नसणार. जर कोणत्याही मुलाला सुहानासोबत मैत्री करायची असले तर त्यासाठी शाहरूख घालून दिलेले नियम त्याला पाळावे लागतील. 
 
शाहरूख मोठ्या पडद्यावर भलेही रोमँटिक हीरो आहे. मात्र कोणत्याही मुलाची सुहानासोबत जवळीक असेल तरी शाहरूख त्याचा रागच करणार, असे स्वतः शाहरूखनं स्पष्ट केले आहे.  
(VIDEO : विन डिझेल भारतात दाखल, मुंबईत मराठमोळे स्वागत)
माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड होण्यासाठी कोणत्याही मुलाला बरीच मेहनत घ्यावी लागेल, असे शाहरूखने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. जो कुणी सुहानासोबत डेटवर जाण्याचा विचार करत असेल, त्या मुलासाठी शाहरूखने काही नियम तयार केले आहे. 
 
सुहानाचा बॉयफ्रेंड व्हायचे आहे?, तर हे नियम पाळावे लागतील.
1. मुलगा नोकरी करणार हवा
2. मला तू आवडत नाहीस, हे समजून घ्यावे  
3. माझी प्रत्येक ठिकाणी नजर असणार  
4. स्वतःचा एक वकील नेमावा  
5. ती माझी राजकुमारी आहे, तू जिंकलेली जहागिरी नाही 
6. तुरुंगात जायला मला हरकत नाही 
7.  माझ्या मुलीला जशी वागणूक देशील तसेच मी तुझ्यासोबत वागेन  
(प्रतिभावंत गायक मा.कुमार गंधर्व यांची पुण्यतिथी)
 
सुहाना सध्या 16 वर्षांची असून तिला अभिनयाची आवड आहे. दरम्यान, शाहरूखच्या या 7 कलमी नियमांमुळे सुहानासाठी अभिनयाचे क्षेत्र सहजसोपे असेल, असे अजिबात वाटत नाही. 
 
शाहरूखने मुलाखतीत असेही सांगितले की, माझ्या मुलीने तो प्रत्येक अनुभव घ्यावा, जो माझ्या सहकलाकार अभिनेत्रीने घेतला आहे. ती प्रत्येक गोष्ट तिने सहन करावी, जी माझी सहअभिनेत्रीने सहन केली आहे. अन्य अभिनेत्रींप्रमाणे सुहानानंही प्रत्येक मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसावी, अशी माझी इच्छा आहे.  
 
तिने सर्व प्रकारचे कपडे तिने घालावेत, सेक्सी-सुंदर-आकर्षक दिसावे, तिने केलेल्या कार्यामुळे लोकांनी तिचा आदर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने खूप मेहनत करावी. तिने अभिनय क्षेत्रात यावे मात्र त्याआधी अभ्यास पूर्ण करावा, अशी अट असल्याचेही शाहरूखने सांगितले. 
 

Web Title: Shahrukh Khan's 7-Point Burden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.