‘या’ अभिनेत्रींनी साकारले ‘टेडी’सोबत आॅनस्क्रीन सीन्स!

By Admin | Published: February 10, 2017 03:45 AM2017-02-10T03:45:11+5:302017-02-10T03:45:11+5:30

‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा. प्रेमाची कबुली दिली तर याच आठवड्यात, असं काही असतं का? तर नाही.

'These' actresses got 'Ensched screen' with Teddy! | ‘या’ अभिनेत्रींनी साकारले ‘टेडी’सोबत आॅनस्क्रीन सीन्स!

‘या’ अभिनेत्रींनी साकारले ‘टेडी’सोबत आॅनस्क्रीन सीन्स!

googlenewsNext

‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा. प्रेमाची कबुली दिली तर याच आठवड्यात, असं काही असतं का? तर नाही. ज्या प्रेयसीवर आपण जीवापाड प्रेम करत असतो, तिच्याजवळ आपल्या प्रेमाची कबुली देण्याची संधी हा आठवडा प्रत्येक तरुणाला देत असतो. आपला प्रियकर केव्हा आपल्याजवळ त्याचं प्रेम व्यक्त करेल, अशी आतुरता अर्थात प्रेयसीलाही असतेच. ‘हटके स्टाईल’ आणि ‘युनिक अंदाजात’ प्रेम व्यक्त करण्यात यावं एवढीच अपेक्षा प्रेयसीची प्रियकराकडून असते. काहींना लाल रंगाचा गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करायला आवडतं तर कुणाला टेडी बिअर देऊन... प्रकार वेगळे असले तरीही प्रेम व्यक्त होणं गरजेचं असतं. आता हेच पाहा ना, ‘बी टाऊन’च्या अनेक अभिनेत्रींना ‘टेडी बिअर’ प्रचंड आवडतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या चित्रपटात ‘टेडी’सोबत काही सीन्स शूट केले आहेत. पाहुयात, कोण आहेत या अभिनेत्री ...


काजोल :
‘बॉलिवूडची सिमरन’ म्हणजेच काजोल. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ मधील काजोल आणि शाहरुख खान या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. राज-सिमरन यांची जोडी आजपर्यंतच्या सर्व रोमँटिक जोड्यांपैकी एक मानली जाते. या जोडीच्या रोमान्सची अदाच काही और आहे. या चित्रपटात काजोलने सिमरन या अतिशय साध्या पण क्यूट युवतीची भूमिका साकारलीय. चित्रपटात अनेकदा ती टेडीला घेऊन नाचताना दिसते.

ईशा देओल :
अर्जुन सबलोक दिग्दर्शित ‘ना तुम जानो ना हम’ या चित्रपटात ईशा देओलने ‘ईशा मल्होत्रा’ची व्यक्तीरेखा साकारली असून ती एक क्यूट अशी कॉलेज गोर्इंग युवती असते. सुख-दु:खात ती तिच्याकडे असलेल्या टेडी बिअरसोबत बोलत असते. तिचा टेडी हाच तिचा दोस्त, हमदर्द आणि साथी असतो. २००२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटापासून ‘टेडी बिअर’ची क्रेझ युथमध्ये सुरू झाली, असे म्हणायला हरकत नाही.

भाग्यश्री :
सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट १९८९ यावर्षी प्रदर्शित झाला. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री या जोडीने प्रेक्षकांना मैत्रीचा नवा अर्थ शिकविला. तरुण आणि तरुणी यांच्यात प्रेमाशिवाय निखळ मैत्रीही होऊ शकते, असे एक वेगळे चित्र या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आले. यातही सुमन (भाग्यश्री) जवळ एक टेडी बिअर असतो. सूरज (सलमान खान) तिला एक चांगली मैत्रीण म्हणून टेडी बिअर गिफ्ट करतो.

मावरा होकेन :
राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’ चित्रपटात मुख्य भूमिका हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांनी केल्या आहेत. इंदर परिहार आणि सरस्वती पार्थसारथी या व्यक्तीरेखा या दोन कलाकारांनी साकारल्या आहेत. या चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले, तेव्हा त्यात मावरा होकेन हिची ड्रेसिंग टेडी बिअरच्या रूपात दिसते. तिचा हा लूक अत्यंत क्यूट आणि आकर्षक दिसतो. चित्रपटातही ती बऱ्याच वेळेला टेडी बिअरसोबत तिचे सुख-दु:ख शेअर करताना दिसली आहे.

सोनाक्षी सिन्हा :
मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपट २०१३ यावर्षी रिलीज झाला. ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’चा हा सिक्वेल आहे. या सिक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाने एका चुलबुल्या अशा तरुणीची भूमिका साकारलीय. ‘जस्मिन’ नावाची व्यक्तिरेखा ती साकारत असून तिचा निरागसपणा आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन प्रेक्षकांना खूप भावतो. या चित्रपटात तिचे काही सीन्स टेडी बिअरसह शूट करण्यात आले आहेत.

Web Title: 'These' actresses got 'Ensched screen' with Teddy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.