तर क्वीन कंगनाने 'ती'च्या श्रीमुखात लगावली असती

By Admin | Published: February 19, 2017 11:56 AM2017-02-19T11:56:24+5:302017-02-19T11:56:24+5:30

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौतचा पडद्यावर आणि वैयक्तिक आयुषातील बिनधास्त आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांनी अनुभवला आहे.

Then Queen Kangana would have put her in the head of the Ti | तर क्वीन कंगनाने 'ती'च्या श्रीमुखात लगावली असती

तर क्वीन कंगनाने 'ती'च्या श्रीमुखात लगावली असती

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौतचा पडद्यावर आणि वैयक्तिक आयुषातील बिनधास्त आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आपल्याला वाटेल ते करणारी, मनात येईल तसे बिनधास्त आणि कशाची पर्वा न करता रोखठोक बोलणारी कंगनाची प्रत्येक अदा मनात घर करुन जाते.

रिल आणि रिअल लाइफमध्येही कंगना बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. फटकळ आणि जे मनात येईल ते मागचा पुढचा विचार न करता कंगना व्यक्त होत असते. तिच्या याच स्वभावाची अनुभूती नुकतीच सा-यांना आली. निमित्त होतं ते कंगणाच्या आगामी रंगून सिनेमाच्या प्रमोशनचे आणि ठिकाण होते ते द वॉईस इंडिया सीझन-2 या रियालिटी शोचा सेट.

रंगून सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमाचे कलाकार असलेले अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता शाहिद कपूर या शोमध्ये आले होते. यावेळी मोठ्या उत्साहात या स्टार कलाकारांचं मंचावर स्वागत करण्यात आलं. त्यावेळी शोमधील कोच सलीम आणि कोच शान यांनी या शोची होस्ट सुगंधा मिश्रा हिची मस्करी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुगंधाला कंगणाची मिमिक्री करण्यासाठी गळ घातली आणि सुगंधा त्यासाठी तयारही झाली. मात्र त्यानंतर सेटवर जे काही घडले ते सारं काही धक्कादायक आणि अनपेक्षित होते.

सुगंधाने केलेली नकल कंगनाला काही आवडली नाही आणि तिने रागात मला हिच्या कानशिलात लगावण्याची इच्छा आहे. कंगनाच्या या विधानामुळे सेटवर काही काळ तणावाचं आणि गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. अचानक कंगणाचे काय बिनसलं, काय नेमकं घडलं याचा अंदाज कुणालाच आला नाही. याआधीही कंगनाच्या रागाचा सुगंधाने अनुभव घेतला आहे. त्यामुळे सुगंधाच्या चेह-यावरही चांगलेच बारा वाजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कंगना फटकळपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या याच ऍटिट्यूडमध्ये कंगणाने करियरमध्ये यश मिळवलं आहे. मात्र कंगनाचा या सेटवरील हे विधान मात्र सा-यांचीच बोलती बंद करणारं होतं.

Web Title: Then Queen Kangana would have put her in the head of the Ti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.