कंगनाची नवी इनिंग, या सिनेमाचं करणार दिग्दर्शन

By Admin | Published: March 1, 2017 11:14 AM2017-03-01T11:14:32+5:302017-03-01T11:30:36+5:30

गँगस्टार चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौत आता नवी इनिंग सुरु करणार आहे.

Kangna's new Inning, a directorial to this movie | कंगनाची नवी इनिंग, या सिनेमाचं करणार दिग्दर्शन

कंगनाची नवी इनिंग, या सिनेमाचं करणार दिग्दर्शन

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - गँगस्टार चित्रपटापासून आपल्या करीअरची सुरुवात करणारी बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौत आता नवी इनिंग सुरु करणार आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार अभिनयामध्ये तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारी कंगना सध्या दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार आहे. याची अधिकृत घोषणा ती लवकरच करणार आहे. 


माध्यमांच्या वृत्तानुसार, कंगना केतन मेहता यांच्या राणी लक्ष्मीबाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, दिग्दर्शनाबरोबरच ती यामध्ये मुख्य भूमिकाही करणार आहे. सध्या कंगना हंसल मेहता यांच्या सिमरन या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यानंतर कंगना राणी लक्ष्मीबाई या चित्रपटाला सुरुवात करणार आहे.

सिमरनमध्ये कंगनाची भूमिका ३० वर्षांच्या घटस्फोटित महिलेची असल्याचे वृत्त आहे. गेल्या शुक्रवारी कंगना, शाहिद आणि सैफ यांचा रंगून चित्रपटगृहात झळकळला आहे, या चित्रपटाला सरासरी यश मिळाले आहे.

Web Title: Kangna's new Inning, a directorial to this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.