विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती

By Admin | Published: April 7, 2017 09:47 AM2017-04-07T09:47:35+5:302017-04-07T10:09:15+5:30

प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

Vinod Khanna's condition stable, doctors said | विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती

विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती

googlenewsNext

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 7 - शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. शरीरातील पाणी अचानक कमी झाल्यामुळे विनोद खन्ना यांना मागच्या आठवडयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
गिरगावच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृतीत सुधारणेसाठी विनोद खन्ना यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांच्या कुटुंबाने हितचिंतकांचे आभार मानले असून प्रायव्हसीचा आदर करावा असे म्हटले आहे. 
 
विनोद खन्ना यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण आहे. फोटोमध्ये ते अगदीच अशक्त झाल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 
 
आणखी वाचा 
आजारपणामुळे विनोद खन्ना यांना ओळखणंही कठीण
 
विनोद खन्ना यांचा मुलगा राहुलने गुरुवारी आता बाबांची प्रकृती ठिक असून त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली. राहुलनं हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचा-यांचा मी खूप आभारी आहे. हॉस्पिटलमध्ये बाबांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात आली. प्रकृतीत चांगल्या गतीनं सुधारणा होत असल्यानं त्यांना लवकरच डिस्चार्ज देणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.  
 
विनोद खन्ना यांनी "मेरे अपने", "कुर्बानी", "पूरब और पश्चिम", "रेशमा और शेरा", "हाथ की सफाई", "हेरा फेरी", "मुकद्दर का सिकंदर" यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
 
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये "मन का मीत" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत "दिलवाले" या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. चित्रपटसृष्टीत नाव, यश, प्रसिद्धी कमावल्यानंतर विनोद खन्ना राजकारणाकडे वळले. राजकारणाच्या मैदानातही ते यशस्वी ठरले. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. 

Web Title: Vinod Khanna's condition stable, doctors said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.