सोनू निगमवर लष्कर न्यायालयात खटला

By admin | Published: April 20, 2017 07:06 AM2017-04-20T07:06:19+5:302017-04-20T07:06:19+5:30

गायक सोनू निगम (अंधेरी, मुंबई) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लष्कर न्यायालयात त्यांच्यावर खासगी खटला दाखल करण्यात आला आहे

Sonu Nigam's case in the Army Court | सोनू निगमवर लष्कर न्यायालयात खटला

सोनू निगमवर लष्कर न्यायालयात खटला

Next

पुणे : गायक सोनू निगम (अंधेरी, मुंबई) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लष्कर न्यायालयात त्यांच्यावर खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल वाय. पी. पुजारी यांच्या न्यायालयाने २४ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.
अन्वर हुसेन बुडन शेख (बोपोडी) यांनी अ‍ॅड. वाजेद खान (बीडकर) यांच्यातर्फे हा खटला दाखल केला असून भारतीय दंडविधानाच्या कलम १५३ ए आणि २९५ ए नुसार हा खटला दाखल करण्यात आला असून त्याचा क्रमांक १२९३/१७ आहे.
शेख म्हणाले, प्रसिद्धीसाठी निगम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने मी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यासाठी गेलो होतो. मात्र ती घेतली न गेल्याने न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने आमचा अर्ज स्वीकारला असून त्यावर २४ तारखेला सुनावणी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sonu Nigam's case in the Army Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.