ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- काही दिवसांपूर्वी कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्याच द कपिल शर्मा शोच्या सेटवर बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याला कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांच्या "जब हॅरी मेट सेजल" या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये सहभागी होणार होते. पण कपिल सेटवर बेशुद्ध पडल्याने त्या दिवशीचं शूटिंग रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनाही परत जावं लागलं होतं. पण या प्रकरणात आता नवी माहिती समोर येते आहे. सेटवर बेशुद्ध पडण्याचा कपिलने बनाव केल्याचं बोललं जातं आहे. कपिल शर्माला त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करायचं होतं म्हणून त्याने आजारपणाचं नाटक केलं, असं वृत्त एका ऑनलाइन पोर्टलने दिलं आहे.
आणखी वाचा
वेबपोर्टलच्या वृत्तानुसार, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कपिल शर्मा उपचारासाठी दाखल झाल्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे कपिल त्यादिवशी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. विशेष म्हणजे दुसऱ्य दिवशी तो लोखंडवालामधील जनरल स्टुडिओमध्ये आपल्या "फिरंगी" या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता, असं वृत्त वेबपोर्टलने दिलं आहे. कपिल जर खरंच आजारी होता तर दुसऱ्या दिवशी आपल्या सिनेमाच्या शूटसाठी सेटवर कसा काय पोहोचला? याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. कपिलला शाहरुख- अनुष्कासोबतच्या एपिसोडपेक्षा "फिरंगी" सिनेमाचं शूटिंग महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळेच त्याने आजारी असल्याचं नाटक केलं असावं, असं बोललं जातं आहे.
आजारपणामुळे रद्द केलेल्या शाहरूखसोबतच्या एपिसोडचं शूटिंग लवकरच कपिल करणार आहे. या एपिसोडमध्ये अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक इम्तियाज अली सहभागी होणार आहेत.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर कॉमेडीअन कपिल शर्मा काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
फिरंगी या सिनेमाचं शूटिंग सध्या अंतिम टप्प्यात आहे. राजीव ढींगरा या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून अभिनेत्री इशिता दत्ता आणि कपिल शर्मा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
Web Title: Unconscious play on Kapil's set for shooting of the movie?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.