राजकारणाच्या नावाखाली फवाद खानचा बळी - रणबीर कपूर

By Admin | Published: July 11, 2017 01:38 PM2017-07-11T13:38:47+5:302017-07-11T13:41:10+5:30

"आपण फवाद खानचे प्रशंसक असून, "ए दिल है मुश्किल" चित्रपटाच्या रिलीजदरम्यान त्याला वादात ओढण्यात आलं याचं वाईट वाटतं"

Freedom Khan's death in the name of politics - Ranbir Kapoor | राजकारणाच्या नावाखाली फवाद खानचा बळी - रणबीर कपूर

राजकारणाच्या नावाखाली फवाद खानचा बळी - रणबीर कपूर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपण फवाद खानचे चाहते असल्याचं सांगितलं आहे. "आपण फवाद खानचे प्रशंसक असून, "ए दिल है मुश्किल" चित्रपटाच्या रिलीजदरम्यान त्याला वादात ओढण्यात आलं याचं वाईट वाटतं",  असं रणबीर कपूर बोलला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने सोनम कपूरसोबत "खुबसूरत" चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 
 
संबंधित बातम्या
मोहम्मद रफींचा अपमान केल्याने " ए दिल"ची " मुश्किल" आणखी वाढली
VIDEO-"ए दिल है मुश्किल"ची पडद्यामागची मज्जा
मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून "कलटी"?
 
पाकिस्तानमध्ये फवाद एक मोठं नाव असून, बॉलिवूड पदार्पणानंतर भारतातही त्याचे करोडो चाहते झाले होते. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना विरोध होऊ लागला होता. फवाद खानने "ए दिल है मुश्किल" चित्रपटात छोटी भूमिका निभावली होती. त्यामुळेच राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला होता. अखेर या वादानंतर फवाद खानला भारत सोडून पाकिस्तानात जावं लागलं होतं.  
 
रणबीर कपूरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, " मी फवाद खानचा मोठा चाहता आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. "ए दिल है मुश्किल" चित्रपटातील त्याची भूमिका अत्यंत महत्वाची आणि प्रभाव पाडणारी होती. छोटी भूमिका असतानाही त्याने ती करण्याची तयारी दर्शवली होती".
 
"राजकीय आंदोलनाची छळ फवाद खानला सोसावी लागली हे दुर्देवी आहे. पण तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे पाहून मी शिकण्याचा प्रयत्न करतो. एक मित्र म्हणूनही माझं त्याच्याशी चांगलं जुळतं. त्याच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर 
करायला मला आवडेल", असं रणबीर कपूर बोलला आहे.  "माझे आई, वडिलदेखील फवाद खानचे चाहते आहेत. माझी आई त्याचे टीव्ही शोदेखील पाहते. त्याचं "कपूर अॅण्ड सन्स" चित्रपटामधील काम मला आवडलं होतं. माझी आई तर त्यांची खूप मोठा चाहती आहे", असं रणबीर कपूरने सांगितलं आहे. 
 
"ए दिल है मुश्किल" चित्रपट हा रणबीर आणि करण जोहरचा पहिलाच चित्रपट होता. पुन्हा करणसोबत काम करायला मिळाल्यास आपल्याला आवडेल अशी प्रतिक्रिया रणबीरने दिली आहे. रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट "जग्गा जासूस"च्या प्रमोशनमधअये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीरसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ दिसणार आहे. या शुक्रवारी म्हणजेच 14  जुलैला चित्रपट रिलीज होत आहे. 
 

Web Title: Freedom Khan's death in the name of politics - Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.