शाहरुखने सोन्याच्या ताटात घेतला जेवणाचा आस्वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:15 AM2017-07-19T02:15:11+5:302017-07-19T02:15:11+5:30

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त शाहरुख सध्या जोधपूर आणि जयपूरच्या दौऱ्यावर असून त्याच्या दौऱ्यातील

Shahrukh took a gold meal! | शाहरुखने सोन्याच्या ताटात घेतला जेवणाचा आस्वाद!

शाहरुखने सोन्याच्या ताटात घेतला जेवणाचा आस्वाद!

googlenewsNext

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त शाहरुख सध्या जोधपूर आणि जयपूरच्या दौऱ्यावर असून त्याच्या दौऱ्यातील काही फोटोंनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. कधी स्थानिक पोशाखात, तर कधी राजस्थानी अंदाजात तो लोकांना आपलेसे करीत आहे. परंतु, आता समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरुखचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यात तो चक्क सोन्याच्या ताटात राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. प्रमोशनदरम्यान शाहरुखच्या राजस्थानी दौऱ्यातील काही फोटोज् सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फोटोमध्ये तो राजस्थानी पगडीमध्ये, तर दुसऱ्या फोटोत चक्क सोन्याच्या ताटात जेवण करताना दिसत आहे. शाहरुखने पहिल्यांदाच राजस्थानी फूड रेस्टॉरंटमध्ये सोन्याच्या ताटात दाल-बाटी आणि चुरमाची चव चाखली आहे. जो कोणी राजस्थानी जेवणाची चव चाखतो, तो त्याचा चाहता बनतो. शाहरुखला बघून याची जाणीवही होते. कारण ताटभर असलेल्या जेवणाला शाहरुख ज्या पद्धतीने एकटक बघून न्याहाळत आहे, त्यावरून तो राजस्थानी जेवणाच्या प्रेमात पडला असेल, यात शंका नाही. शाहरुखला तब्बल १४ वाट्यांमध्ये राजस्थानी खाद्यपदार्थ वाढले होते. शाहरुखनेही मोठ्या चवीने दोन वाट्यांमधील पदार्थांची चव चाखली. याव्यतिरिक्त त्याने जोधपुरी गट्टेची भाजी, कॅर सांगरी, बेसनचा चुरमा, प्लेन चुरमा कढी, घेवर, मालपुुवा, केसरची खीर आणि राजस्थानी पापडाचीही चव चाखली.

Web Title: Shahrukh took a gold meal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.