‘या’ सेलिब्रिटींनी केले दुसरे लग्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:22 AM2017-07-19T02:22:16+5:302017-07-19T02:22:16+5:30

असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात. मात्र, हे लग्नाचे नाते आयुष्यभर टिकावे यासाठी तुमचे आपल्या जोडीदारावर जिवापाड प्रेम असावे लागते.

'These' celebrities make another wedding! | ‘या’ सेलिब्रिटींनी केले दुसरे लग्न!

‘या’ सेलिब्रिटींनी केले दुसरे लग्न!

googlenewsNext

- Suvarna Jain

असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात. मात्र, हे लग्नाचे नाते आयुष्यभर टिकावे यासाठी तुमचे आपल्या जोडीदारावर जिवापाड प्रेम असावे लागते. तरच ते नाते फुलते आणि बहरतेही. सामान्यांच्या बाबतीत रियलमध्ये हे घडतं. मात्र सेलिब्रिटी मंडळींच्या बाबतीत ही बाब काहीशी वेगळी असते. ‘कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे’ या प्रसिद्ध गाण्यांच्या ओळींप्रमाणे या झगमगत्या दुनियेत नाती फार काळ टिकत नाही. त्यांचे या ना त्या कारणामुळे ब्रेकअप आणि नाती तुटणं सेलिब्रिटींसाठी नवं नाही. पहिलं लग्न अपयशी ठरलं तरी दुसरं लग्न करून सेलिब्रिटी नवा संसार थाटतात. अशी बरीच उदाहरणं ‘बी टाऊन’मध्ये पाहावयास मिळतात. अशा जोडप्यांचा घेऊयात आढावा...

आमिर खान आणि किरण राव
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने त्याची पहिली पत्नी रिना दत्ता हिला घटस्फोट दिला. त्यावेळी ही बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला. यानंतर आमिरनं किरण रावशी दुसरं लग्न केलं. आमिर आणि किरणची लगान सिनेमाच्या सेटवर ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. काही महिन्यांनंतर दोघंही रेशीमगाठीत अडकले. सध्या दोघांचाही सुखी संसार सुरू आहे.

संजय दत्त आणि मान्यता दत्त
बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तच्या जीवनात अनेक चढउतार आलेत. त्यांच्या जीवनात अनेक वादळं आली. संजय दत्तचं पहिलं लग्न यशस्वी ठरलं नाही. त्यानं रिहा पिल्लईला काडीमोड देऊन मान्यता दत्त हिच्याशी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तच्या जीवनातील कठीण प्रसंगी मान्यता त्याच्यासोबत ठामपणे उभी होती. त्यामुळेच संजय दत्तनं त्याचं पुढचं आयुष्य मान्यतासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघंही सुखानं नांदत आहेत.

शेफाली शाह आणि
विपुल शाह
‘रंगीला’ सिनेमातून अभिनेत्री शेफाली शाह हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच दरम्यान १९९७ साली शेफालीनं अभिनेता हर्ष छायासह लग्न करून संसार थाटला. मात्र दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. चार वर्षांनंतरच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शेफालीनं २००१ साली प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्न केलं. विपुल शाह आणि शेफाली शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. त्यांना दोन मुलं असून शेफाली अजूनही सिनेमात काम करत आहे.

हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी म्हणजे हितेन आणि गौरी प्रधान. रिल लाइफप्रमाणे रियल आयुष्यातही दोघांचं घट्ट नातं आहे. मात्र फार कमी जणांना माहीत आहे की हितेनचं गौरीसोबत दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. करियरची सुरुवात केली त्याच वेळी अवघ्या महिन्यात हितेन रेशीमगाठीत अडकला होता. मात्र करियरमुळे पहिल्या पत्नीला वेळ देऊ शकत नसल्यानं दोघांमध्ये प्रेमाचं नातं बहरलं नाही. त्यामुळेच त्यानं पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. याच काळात हितेनच्या आयुष्यात गौरीची एंट्री झाली. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असून आता सुखी संसार करत आहेत.

रोनित रॉय आणि नीलम बोस
अभिनेता रोनित रॉय याचं ओना हिच्याशी पहिलं लग्न झालं होतं. मात्र, दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. त्यांची मुलगी अवघी सहा महिन्यांची असताना रोनितनं ओनाशी घटस्फोट घेतला. यानंतर रोनितनं त्याची मैत्रीण नीलम बोस हिच्याशी लग्न केलं. दोघंही आता सुखानं संसार करत असून आपल्या वैवाहिक जीवनात खूश आहेत. नीलम जीवनातील प्रत्येक संकटक्षणी ठामपणे पाठीशी उभी राहिल्याचं रोनितनं सांगितलं.

करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू
अभिनेता करणसिंह ग्रोव्हर एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे करणसिंहनं कायमच साऱ्यांच्या नजरा आकर्षित केल्या. त्यामुळेच की काय त्याच्या नायिकाही त्याच्यावर फिदा झाल्या. त्यामुळेच २००८ साली त्यानं श्रद्धा निगम हिच्याशी लग्न केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. दहा महिन्यांत दोघांच्या नात्याला पूर्णविराम लागला. यानंतर करणनं २०१२ साली त्याची सहनायिका जेनिफर विंगेटशी लग्न केलं. मात्र करण आणि जेनिफरचं नातंही फार काळ टिकलं नाही. यानंतर करणच्या आयुष्यात एंट्री झाली ती बंगाली बाला बिपाशा बासूची. दोघांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन दोघंही लग्नबंधनात अडकले. सध्या दोघंही एकत्र संसार करतायत.

Web Title: 'These' celebrities make another wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.