सूरत ते मुंबई, लाईव्ह हार्टची डिलिव्हरी अवघ्या 55 मिनिटांत

By Admin | Published: April 12, 2016 01:13 PM2016-04-12T13:13:46+5:302016-04-12T13:21:36+5:30

सुरत मधलं हॉस्पिटल ते मुंबईमधलं फोर्टीज हॉस्पिटल हा प्रवास ह्रदय प्रत्योरोपणासाठी निघालेल्या लाईव्ह हार्टनं काल सोमवारी रात्री अवघ्या 55 मिनिटांमध्ये केला.

Surat Mumbai, live heart delivery in just 55 minutes | सूरत ते मुंबई, लाईव्ह हार्टची डिलिव्हरी अवघ्या 55 मिनिटांत

सूरत ते मुंबई, लाईव्ह हार्टची डिलिव्हरी अवघ्या 55 मिनिटांत

googlenewsNext
>योगेश मेहेंदळे
मुंबई, दि. 12 - सुरत मधलं हॉस्पिटल ते मुंबईमधलं फोर्टीज हॉस्पिटल हा प्रवास ह्रदय प्रत्यारोपणासाठी निघालेल्या लाईव्ह हार्टनं काल सोमवारी रात्री अवघ्या 55 मिनिटांमध्ये केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली MAB अॅव्हिएशननं, कारण त्यांनी रात्रीच्या अत्यंत गर्दीच्या वेळीही चोख नियोजनाच्या आधारे अवघ्या 34 मिनिटांमध्ये लाईव्ह हार्ट मुंबईच्या विमानतळावर उतरवलं.
MAB अॅव्हिएशनचे प्रमुख मंदार भारदे यांनी ऑनलाइन लोकमतशी बोलताना सांगितलं की,  "सुरतमधलं हॉस्पिटल ते सूरत विमानतळ 9 मिनिटं, तिथून मुंबई विमानतळ 34 मिनिटं आणि त्यानंतर फोर्टीज हॉस्पिटलपर्यंत पोचायला लागलेली 12 मिनिटं अशा अवघ्या 55 मिनिटांमध्ये लाईव्ह हार्टचा प्रवास झाला. डॉक्टरांच्या टीम्स, विमानकंपनी, एअर फोर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोल अशा सगळ्यांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध रीतीने केलेला भारतातला हा पहिला प्रयोग आहे."
ब्रेन डेड व्यक्तिचे अवयव ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तिच्या शरीरात वापरण्यासाठी काढण्यात येतात, त्यावेळी अवघा 4 ते 6.30 तासांचा अवधी उपलब्ध असतो. एकेक मिनिट अत्यंत मोलाचं असतं, कारण जर सदर अवयव दुसऱ्या शहरातील रुग्णापर्यंत वेळेत पोचला नाही, तर तो अवयव निकामी होतो.
भारदे यांच्या MAB अॅव्हिएशननं रात्रीच्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या ट्रॅफिकमधल्या वेळी लाईव्ह हार्टच्या डिलिव्हरीसाठी ग्रीन कॉरीडॉरचा वापर केला. पंतप्रधान किंवा त्यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी ही संकल्पना असून सरकारी अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हार्ट ट्रान्सप्लान्टसारख्या महत्त्वाच्या घटनेसाठीही याचा वापर केला गेला आणि 34 मिनिटांमध्ये मुंबई विमानतळावर उतरणे शक्य झाले.
 
MAB अॅव्हिएशनचे मंदार भारदे
 
 
या अभूतपूर्व प्रयोगाच्या यशस्वी होण्यामागे दिलेली कारणे:
- स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा SOP मध्ये जास्तीत जास्त डॉक्टरांचा समावेश.
- विमान कप्तानासह वेळेआधीच सूरत विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज.
- एअर फोर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोल तसेच सुरक्षा यंत्रणांना विश्वासात घेऊन त्यांची घेतलेली मदत.
- डॉक्टरांना लवकरात लवकर अवयव मिळावे यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करण्याचा सगळ्या टीमनं घेतलेला ध्यास.
 
अवयव प्रत्यारोपणाचाच एकंदर खर्च विचारात घेता, त्यामध्ये एअर अँब्युलन्सचा खर्च फारच कमी असल्याचे भारदे यांनी सांगितले. तसेच, अवयव प्रत्यारोपणासंदर्भात विमा कंपन्यांशीही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Surat Mumbai, live heart delivery in just 55 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.