मासिक पाळीच्या वेळी चीनमध्ये महिलांना रजा

By admin | Published: February 18, 2016 06:41 AM2016-02-18T06:41:18+5:302016-02-18T06:41:18+5:30

नोकरी करीत असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत रजा देण्यासाठी चीनच्या एका प्रांतात सहमती दर्शविण्यात आली आहे.

Chinese women leave for menstrual period | मासिक पाळीच्या वेळी चीनमध्ये महिलांना रजा

मासिक पाळीच्या वेळी चीनमध्ये महिलांना रजा

Next

पेइचिंग : नोकरी करीत असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत रजा देण्यासाठी चीनच्या एका प्रांतात सहमती दर्शविण्यात आली आहे. अर्थात त्यासाठी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.
नोकरी करीत असलेल्या महिलांना मासिक पाळी आल्यास किंवा मासिक पाळीमुळे त्रास होत असल्यास त्यांना तो निमूटपणे सहन करावा लागतो. महिलांना दर महिन्याला होणाऱ्या या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी रजा देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनमधील एका वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. अर्थात महिलांना अशा प्रकारे रजा देणारा हा पहिला प्रांत नाही, तर यापूर्वीही काही प्रांतांत अशी सुविधा देण्यात आलेली आहे. दरम्यान, एका सर्व्हेनुसार याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल, म्हणून २० टक्के महिलांनी या सुटीवर असहमती दर्शविली आहे.
(वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Chinese women leave for menstrual period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.