ब्रसेल्स स्फोट : गायक अभिजीतच्या पत्नी-मुलाची सुखरूप सुटका
By admin | Published: March 22, 2016 02:41 PM2016-03-22T14:41:59+5:302016-03-22T14:52:34+5:30
गायक अभिजीत भट्टाचार्यची पत्नी व मुलगाही ब्रसेल्स विमानतळावर उपस्थित होते, मात्र सुदैवाने ते सुखरूप असून त्यांची सुटका करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २२ - आज सकाळी झालेल्या दोन बाँबस्फोटांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स हादरली असून आत्तापर्यंत १३ नागरिक ठार तर ३५ जण ठार झाले. अनेक निरपराधांचा बळी घेणा-या या विमानतळावर प्रसिद्ध भारतीय गायक अभिजीत भट्टाचार्य याची पत्नी व मुलगाही अडकले होते. खुद्द अभिजीतनेच यासंदर्भात ट्विट केले आहे.
' आत्ताच माझे पत्नी व मुलाशी बोलण झाले, ते सुखरूप आहे. त्यांची सुटका करण्यात येत असून त्यांना एका सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. थँक्स जेटएअरवेज' असे ट्विट त्याने केले आहे.
ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर मालबीक मेट्रो स्थानकावर स्फोट झाला. या स्फोटांमध्ये १३ जण ठार झाले असून, ३५ जण जखमी झाले आहेत तसेच विमानतळावर अनेक बॉम्ब सापडले आहेत. आरटीबीएफच्या वृत्तानुसार सकाळी आठच्या सुमारास हे स्फोट झाले.
व्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी हा स्फोट झाला आहे. बेल्जियम प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार विमानतळ रिकामे करण्यात आला असून, सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून शहरातील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या वृत्तानुसार विमानतळावरील नागरीक घाबरलेले असून, विमानतळापासून दूर पळत आहेत. स्फोटानंतर इमारतीच्या काचाही फुटल्या आहेत.
#Brussels jst spoke to my wife n son at #BrusselsAirport..They r bn evacuated to a safe zone God is great.. Thx @jetairways
— abhijeet (@abhijeetsinger) March 22, 2016
दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या स्फोटांमुळे धक्का बसल्याचे सांगत दु:ख व्यक्त केले असून बचावकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज असल्याचे नमूद केले आहे