काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण
By admin | Published: June 10, 2016 11:48 AM2016-06-10T11:48:07+5:302016-06-10T11:54:46+5:30
एनजीओमध्ये काम करणा-या भारतीय महिलेचं काबूलमध्ये अपहरण करण्यात आलं आहे. जुडिथ डिसुजा असं या महिलेचं नाव असून गुरुवारी रात्री तिचं अपहरण करण्यात आलं
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - एनजीओमध्ये काम करणा-या भारतीय महिलेचं काबूलमध्ये अपहरण करण्यात आलं आहे. जुडिथ डिसुजा असं या महिलेचं नाव असून गुरुवारी रात्री तिचं अपहरण करण्यात आलं. जुडिथ डिसुजा कोलकातामधील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची कर्मचारी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील प्रशासन जुडिथ डिसुजाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.
भारतीय दुतावास अफगाणिस्तानमधील अधिका-यांच्या संपर्कात आहे. जुडिथ डिसुजा यांचे कुटुंबिय कोलकातामध्ये राहत असून सरकार त्यांच्यादेखील संपर्कात आहे.
जुडिथ डिसुजा आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची पुर्णवेळ कर्मचारी आहे. इतर कर्मचा-यांसोबत कार्यालयाबाहेर उभे असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तालिबानने हे अपहरण केलं असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही संपर्कात असून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती आगा खान संस्थेने दिली आहे,.