अमेरिकेवर इसिसचा हल्ला!

By admin | Published: June 13, 2016 05:39 AM2016-06-13T05:39:25+5:302016-06-13T05:39:25+5:30

आॅरलँडो शहरात समलैंगिक नाइट क्लबमध्ये घुसून हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले आहेत.

Isis attack on America! | अमेरिकेवर इसिसचा हल्ला!

अमेरिकेवर इसिसचा हल्ला!

Next


आॅरलँडो (अमेरिका) : अमेरिकेत फ्लोरिडा प्रांतात आॅरलँडो शहरात समलैंगिक नाइट क्लबमध्ये घुसून हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांशी झालेल्या चकमकीत हा हल्लेखोर मारला गेला असून हे ९/११ नंतरचे सर्वांत मोठे दहशतवादी कृत्य असल्याचे मानले जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने आपल्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही हे दहशतवादी कृत्य आणि द्वेषातून केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्याच्या पाठीशी असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ओमर मीर सिद्दिकी मतीन असे हल्लेखोराचे नाव असून, तो मूळचा अफगाणिस्तानचा आणि सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास नाइट क्लबच्या बाहेरील अधिकाऱ्याची आणि त्याची चकमक झाली. मतीन त्यानंतर क्लबमध्ये गेला. क्लबमध्ये त्यावेळी ३०० हून अधिक समलिंगी लोक होते. अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात एकतृतीयांश लोकांना गाळ्या लागल्या. त्यानंतर त्याने काही जणांना ओलीस ठेवले. स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस टीमने हल्लेखोर मतीन अखेर ठार केले. (वृत्तसंस्था)
>अमेरिकेच्या इतिहासातील गोळीबाराची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. इस्लामिक स्टेटचे समर्थक या हल्ल्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. इसिसची वृत्तसंस्था ‘अमाक’ने या हल्ल्यामागे आपलेच सदस्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता इसिसविरूद्ध अमेरिका असे युद्धच भडकण्याची चिन्हे आहेत.
>कोणाचीच गयकेली जाणार नाही
अमेरिकेच्या द्वेषातून केलेले हे अतिरेकी कृत्य आहे. आम्ही त्याची मूळे शोधून काढू आणि जो कोणी या कृत्यापाठीमागे असेल त्याची गय केली जाणार नाही. अमेरिकेतील नागरिकांची आणि देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. दहशतवाद्यांची अशी कोणतीही कृती आम्हाला विचलित करू शकत नाही.- बराक ओबामा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
ओमर मतीन असे हल्लेखोराचे नाव आहे. तो मूळ अफगाणिस्तानचा असून सध्या अमेरिकन नागरिक होता. त्याच्याकडे एआर-15 ही रायफल आणि हँडगन होती.

Web Title: Isis attack on America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.