मतीनची ‘इसिस’शी निष्ठा

By admin | Published: June 14, 2016 04:33 AM2016-06-14T04:33:38+5:302016-06-14T04:33:38+5:30

ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून ५० जणांना ठार मारणाऱ्या ओमर मतीन (२९) याने अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या

Matinachi 'Isis' loyalty | मतीनची ‘इसिस’शी निष्ठा

मतीनची ‘इसिस’शी निष्ठा

Next

वॉशिंग्टन : ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून ५० जणांना ठार मारणाऱ्या ओमर मतीन (२९) याने
अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या क्रमांकाद्वारे इसिसशी निष्ठा व्यक्त केली होती.
या नाइट क्लबवर सुरुवातीला हल्ला केल्यानंतर त्याने ९११ या क्रमांकावर इस्लामिक स्टेटचा नेता अबू बकर अल बगदादी याच्याशी निष्ठा व्यक्त केली होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. या फोन संभाषणात मतीन याने बोस्टन बाँबर्स त्सार्नाएव्ह बंधुंबद्दल निष्ठा व्यक्त केली होती. २०१३ मध्ये या बंधुंनी बोस्टन मॅरेथॉनमध्ये बाँबस्फोट घडविले होते.
मतीनने गे क्लबच्या बाथरूममधून ९११ क्रमांकावर फोन करून स्वत:चे पूर्ण नाव त्याला सांगितले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. अध्यक्ष बराक ओबामा यांनी गे क्लब हत्याकांड हे दहशतवादी व द्वेषातून घडवलेले कृत्य असल्याचे म्हटले.
फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या हत्याकांडाची दहशतवादी कृत्य या अंगाने चौकशी करीत आहे, असे ओबामा म्हणाले. हे हत्याकांड संघटित आणि पूर्ण तयारीने घडविल्याचे दिसते, असे ओरलँडोचे पोलीस प्रमुख जॉन मिना यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

काही दिवसांपूर्वीच शस्त्रास्त्रांची खरेदी
आम्हाला या गुन्ह्यातील साथीदार सापडलेले नाहीत, असे ओरलँडो पोलिसांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतीन यापूर्वी एफबीआयच्या रडारवर होता. एफबीआयने त्याची २०१३ व २०१४ मध्ये उलटतपासणीही घेतली होती, परंतु त्यात त्याच्याविरोधात आक्षेपार्ह काही सापडले नव्हते.
२००७ पासून मतीन जीफोर एस सिक्युअर सोल्युशन्स कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला होता. या कंपनीने या हत्याकांडामुळे धक्का बसला असल्याचे सांगून, तपासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मतीनने गेल्या दोन आठवड्यांत ग्लोक पिस्तूल आणि लाँग गन विकत घेतल्याची माहिती दहशतवादविरोधी दलाचे ट्रेव्हर व्हेलिनोर यांनी दिली. हत्याकांडामागील हेतूचा शोध अजूनही अधिकाऱ्यांना लागलेला नाही. ‘इसिस’ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली असली, तरी याला पूरक ठरेल, असा पुरावा एफबीआयला अद्याप सापडलेला नाही.

Web Title: Matinachi 'Isis' loyalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.