पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी
By admin | Published: September 1, 2016 05:14 PM2016-09-01T17:14:23+5:302016-09-01T17:14:23+5:30
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मिडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने संचालक मंडळाच्या बैठकीत भारतीय चॅनेल्सचं प्रसारण पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - जास्तीत जास्त परदेशी कंटेन्ट दाखवणा-या चॅनेल्स आणि केबल ऑपरेटर्सवर कडक कारवाई करण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मिडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (पीईएमआरए) घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानी डीटीएच सर्व्हिस लॉन्च केली जाणार आहे. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे भारतीय डीटीएच डिलर्सविरोधात तात्काळ स्वरुपात कारवाई करण्यात आली आहे. पीईएमआरएने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत भारतीय चॅनेल्सचं प्रसारण पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोणालाही भारतीय चॅनेल्सची सुविधा देण्याची परवानगी नसणार आहे. पाकिस्तामधील आघाडीचं वृत्तपत्र असलेल्या डॉनला पीईएमआरएचे चेअरमन अबसार आलम यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना केबल ऑपरेटर्स आणि सॅटलाईट चॅनेल्सना याकरिता पुरेपूर वेळ देण्यात आला होता असं सांगितलं आहे.