पाकिस्तान करतंय युद्धसराव, कराची आणि लाहोर एअरस्पेस बंद

By Admin | Published: October 5, 2016 11:34 AM2016-10-05T11:34:27+5:302016-10-05T12:23:54+5:30

पाकिस्तानने लाहोर आणि कराचीमधील एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑक्टोबरपासून पुढील 13 दिवसांसाठी हे एअरस्पेस बंद ठेवण्यात येणार आहेत

Pakistan's Warrarrao, Karachi and Lahore Airspace shut down | पाकिस्तान करतंय युद्धसराव, कराची आणि लाहोर एअरस्पेस बंद

पाकिस्तान करतंय युद्धसराव, कराची आणि लाहोर एअरस्पेस बंद

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - पाकिस्तानने लाहोर आणि कराचीमधील एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑक्टोबरपासून पुढील 13 दिवसांसाठी हे एअरस्पेस बंद ठेवण्यात येणार आहेत. दिवसातील 18 तासांसाठी हे एअरस्पेस बंद असणार आहेत. ऑपरेशनल कारणांमुळे हे एअरस्पेस बंद ठेवण्यात येत असल्याचं कारण पाकिस्तानने दिलं आहे. 
 
संरक्षण आणि हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने हवाईदलाच्या माध्यमातून युद्ध सरावासाठी कमर्शियल उड्डाण क्षेत्र रिकामं केलं आहे. पाकिस्तान 8 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत लाहोर, कराचीवरील एअरस्पेस बंद ठेवणार आहे.
अशाप्रकारे युद्ध सराव करणे यात काही नवीन नाही, मात्र इतके व्यस्त एअरस्पेस इतक्या दिवसांसाठी बंद ठेवल्याचं प्रथमच पाहिलं जात असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. पाकिस्तानमध्ये इतक्या दिवसांसाठी एअरस्पेस बंद ठेवल्याचं आठवत नसल्याचंही तज्ञांनी सांगितलं आहे. 
 
पाकिस्तानमधील या लहान मोठ्या घडामोडींवर भारतीय अधिकारी सतत लक्ष ठेवून आहेत. उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे दोन्ही देशात तणाव सुरु असताना पाकिस्तानमधे एअरस्पेस बंद करणं, युद्ध सराव सुरु करणं अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. 
 
नेमक्या याच वेळेला पाकिस्तानने एअरस्पेस बंद करणं योगायोग असल्याचं हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा बोलले आहेत. महत्वाचं म्हणजे भारतासह आशियाहून युरोप आणि मध्यपूर्व भागासाठी एअर ट्रॅफिक कॉरिडोअरमध्ये पाकिस्तान येतं. मात्र भारतातून उड्डाण घेणा-या आंतरराष्ट्रीय विमानांना याचा काही फटका बसणार नाही असं हवाई वाहतूक नियंत्रण अधिका-याने सांगितलं आहे. 
 

Web Title: Pakistan's Warrarrao, Karachi and Lahore Airspace shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.