US ELECTION: मतदान केलंत तर कत्तल करु, ISIS ची धमकी

By admin | Published: November 7, 2016 11:32 AM2016-11-07T11:32:37+5:302016-11-07T11:32:37+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना इसीसने मात्र अमेरिकेतील नागरिकांना मतदान केल्यास कत्तल करु अशी धमकी दिली आहे

US ELECTION: Voting while slaughtering, ISIS threat | US ELECTION: मतदान केलंत तर कत्तल करु, ISIS ची धमकी

US ELECTION: मतदान केलंत तर कत्तल करु, ISIS ची धमकी

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 7 - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक काही तासांवर उरली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना इसीसने मात्र अमेरिकेतील नागरिकांना मतदान केल्यास कत्तल करु अशी धमकी दिली आहे. तसंच मुस्लिम नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. 
 
इसीसने अल हयात मीडिया सेंटरने ट्विटरच्या माध्यमातून 'दहशतवादी तुमची कत्तल करण्यास आणि मतदानप्रक्रिया उधळण्यासाठी पोहोचले आहेत' अशी धमकी  दिल्याचं गुप्ततर यंत्रणा अधिकारी रिट्ज यांनी दिली आहे . सात पानांचा जाहीरनामाचा इसीसने प्रसिद्ध केला असून त्याद्वारे ही धमकी देण्यात आली आहे असं वृत्त युएसए टुडेने दिलं आहे.
 
अशा हल्ल्याचं समर्थन करत इसीसने धार्मिक दावे जाहीरनाम्यात केले आहेत. तसंच रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये काही फरक नसून दोघांच्याही पॉलिसी इस्लाम आणि मुस्लिमविरोधी असल्याचं म्हटलं आहे. या धमकीनंतर मुख्य ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. 
 

Web Title: US ELECTION: Voting while slaughtering, ISIS threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.