US ELECTION - न्यू हॅम्पशायरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 04:31 PM2016-11-08T16:31:38+5:302016-11-08T18:14:39+5:30

न्यू हॅम्पशायरच्या तीन छोटया शहरांमध्ये पारंपारिक मिडनाईट मतदानाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

US ELECTION - Donald Trump leads the lead in New Hampshire | US ELECTION - न्यू हॅम्पशायरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

US ELECTION - न्यू हॅम्पशायरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

Next

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ८ - न्यू हॅम्पशायरच्या तीन छोटया शहरांमध्ये पारंपारिक मिडनाईट मतदानाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यूएसए टुडेच्या वृत्तानुसार रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या अटीतटीचा सामना आहे. 
 
प्रारंभीच्या मतदानाच्या फेरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. डिक्सविले नॉच, हार्टस लोकेशन आणि मिल्स फिल्ड या तीन शहरातील मतदानाच्या निकालानुसार ट्रम्प ३२-२५ ने आघाडीवर आहेत. या तीन्ही शहरात १०० पेक्षा कमी मतदार आहेत. 
 
आणखी वाचा 
भारताच्या 'चाणक्य'ने केली ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी
US ELECTION- हिलरी क्लिंटन यांनी मिळवला पहिला विजय
US ELECTION - शेवटच्या टप्प्यात हिलरी क्लिंटन यांना निसटती आघाडी
Voting while Floating - त्याने अंतराळातून केले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान
 
डिक्सविले नॉचमध्ये हिलरीने ट्रम्प यांच्यावर ४-२ ने विजय मिळवला. हार्टस लोकेशनमध्ये हिलरीला १७ तर, ट्रम्पना १४ मते मिळाली. मिल्सफिल्‍डमध्ये मात्र ट्रम्प यांनी एकतर्फी विजय मिळवला. तिथे ट्रम्पना १६ तर हिलरींना अवघी ४ मते मिळाली. कॅनडाच्या सीमेजवळ असलेल्या न्यू हॅम्पेशायरमध्ये १०० पेक्षा कमी मतदार आहेत. तिथे निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्री मतदानाला सुरुवात होते. अवघे आठ मतदार असलेल्या डिक्सविले नॉचमध्ये अमेरिकन निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर होतो. 
 

Web Title: US ELECTION - Donald Trump leads the lead in New Hampshire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.