US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 05:11 PM2016-11-08T17:11:43+5:302016-11-08T18:13:33+5:30

प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच अमेरिकेत तब्बल ४ कोटी ६० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

US ELECTION - A record turnout in the United States before actual voting | US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान

US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान

Next

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ८ - प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच अमेरिकेत तब्बल ४ कोटी ६० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१२ च्या तुलनेत अर्ली व्होटींगमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. अमेरिकन निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदाराला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधी सुद्धा मतदान करता येते. 
 
यामध्ये पोस्टल वोटस आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येते. आजच्या मतदानामध्ये जवळपास २० कोटी अमेरिकन नागरीक सहभागी होऊ शकतात. २०१२ मध्ये ३ कोटी २० लाख मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाआधी मतदानाचा हक्क बजावला होता.
इतक्या मोठया प्रमाणावर आधीच मतदान होणे हा अमेरिकेत मतदानाचा पॅटर्न बदलल्याचा संकेत आहे असे तज्ञांनी सांगितले.
 
आणखी वाचा 
US ELECTION - न्यू हॅम्पशायरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
US ELECTION - भारताच्या 'चाणक्य'ने केली ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी
US ELECTION- हिलरी क्लिंटन यांनी मिळवला पहिला विजय
US ELECTION - शेवटच्या टप्प्यात हिलरी क्लिंटन यांना निसटती आघाडी
US ELECTION - त्याने अंतराळातून केले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान
 
यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीत मोठया प्रमाणात वाढ होईल तसेच हिलरी क्लिंटन यांना फायदा होईल असे  निवडणूक तज्ञांनी सांगितले. जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढवणे आणि मतदान केंद्रावर गर्दी टाळणे हा अर्ली व्होटींगचा उद्देश असतो. 
 

Web Title: US ELECTION - A record turnout in the United States before actual voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.