भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध

By admin | Published: March 1, 2017 08:31 AM2017-03-01T08:31:46+5:302017-03-01T08:45:32+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्सास येथे झालेल्या भारतीय इंजिनिअरची हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.

Denied of Indian engineer's murder Donald Trump | भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध

भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध

Next

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन,  दि. 1 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्सास येथे झालेल्या भारतीय इंजिनिअरची हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. आमच्या देशात वर्णद्वेष किंवा वर्णभेदला जागा नाही, अशी प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी भारतीय इंजिनिअर हत्या प्रकरणाचा निषेध केला. 
 
बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत पहिल्यांदाच भाषण केले.  यावेळी 'ज्यू केंद्रांना निशाणा बनवणे असो किंवा कन्सासमध्ये झालेला गोळाबार असो. आम्ही प्रत्येक प्रकाराच्या हिंसेचा निषेध करतो', असे सांगत त्यांनी कन्सास गोळीबाराचा निषेध व्यक्त केला.  
 
(व्हाईट हाऊसमध्ये 'घर का भेदी', ट्रम्पचा ओबामांवर घणाघाती आरोप)
 

भारतीय इंजिनिअर हत्या प्रकरण

22 फेब्रुवारीच्या रात्री श्रीनिवास कुचिभोतला यांची गोळ्या घालून हत्या झाली तर या हल्ल्यात अलोक मदासनी हे त्यांचे मित्र जखमी झाले. मदासनी या बैठकीला कुबड्यांवर आला होते. हा गोळीबार झाला त्या रात्री अमेरिकन मारेकऱ्याशी वाद घालून हस्तक्षेप करणारे अमेरिकन आयन ग्रिलोट जखमी झाले. 

अमेरिकन नौदलातून निवृत्त झालेल्या व्यक्तिने कान्सास शहरातील बारमध्ये केलेल्या गोळीबारात श्रीनिवास ठार झाले तर अलोक जखमी. गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने ‘माझ्या देशातून निघून जा’ आणि ‘दहशतवादी’ असे जोरजोरात ओरडून म्हटले होते. हल्लेखोराने बहुधा या दोघांना मध्यपूर्वेतील स्थलांतरीत समजले असावे.

Web Title: Denied of Indian engineer's murder Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.