...तर भारत-चीनमधील प्रश्न सुटू शकतो
By Admin | Published: March 4, 2017 04:37 AM2017-03-04T04:37:35+5:302017-03-04T04:37:35+5:30
तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो
बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत.
२००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता.
दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो.
सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)
>बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत.
२००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता.
दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो.
सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)
>सर्वोच्च न्यायालयाने १९५६ मध्ये एका प्रकरणात स्पष्ट केले होते की, घटनात्मक दुरुस्तीशिवाय हा भाग दुसऱ्या सरकारच्या स्वाधीन करता येणार नाही.