दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 01:26 PM2017-03-21T13:26:23+5:302017-03-21T13:26:23+5:30
चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 21 - चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा भारतात आल्यानं चीननं आगपाखड केली आहे. बिहारमध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय संमेलनात दलाई लामा सहभागी झाले आहेत. त्यावरून चीननं भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा विचार करून त्याला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, असंही चीननं सांगितले आहे.
दलाई लामा यांना आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागासाठी भारतानं दिलेल्या निमंत्रणाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले, भारताने चीनचा कडवा विरोध पूर्णपणे झुगारुन देत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना बौद्ध धर्मीयांच्या 14व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलावले आणि त्यांनीच या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्या कृत्याचा चीन निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे.
चीनच्या स्पष्टीकरणात चुनयिंग यांनी म्हटले, की भारताच्या या कृतीवर चीन पूर्णपणे नाराज आहे आणि यास आम्ही कडाडून विरोध करत आहोत आणि भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीन म्हणाला आहे. चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक मुद्द्यांवर भारताला विरोध करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या ह्यएनएसजीह्ण (आण्विक पुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध केला होता. 48 सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीननं म्हटलं होतं. चीन हा भारताला कायम त्रास देण्याचाच प्रयत्न करत असतो.