बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू

By admin | Published: June 13, 2017 04:47 PM2017-06-13T16:47:09+5:302017-06-13T23:34:14+5:30

बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.

100 people die in Bangladesh's landslide | बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 13 - बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. भूस्खलनाच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमधील 10 लोक हे बंदरबन, तर आठ जण चिटगावातील आहेत.

भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जास्त करून महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनात अनेक घरं नेस्तनाबूत झाली असून, बचावकार्य राबवणारे कार्यकर्तेही चिखलात फसले आहेत. हवामान खराब असल्यामुळे सोमवारी ढाका आणि चिटगावमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. बचावकार्यासाठी चिटगाव जिल्हा प्रशासनानं दोन टीम्स तयार केल्या आहेत. यासाठी दोन मजिस्ट्रेट्सची समितीही गठीत करण्यात येणार आहे.

भूस्खलनाच्या अशा घटना टाळण्यासाठी आणि डोंगराजवळ राहणा-या लोकांचं तातडीनं समिती स्थलांतर करणार आहे. गेल्या महिन्यातच बांगलादेशाला मोरा या चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. या चक्रीवादळानं बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. त्यावेळी 8 जणांचा मृत्यूही झाला होता. तत्पूर्वी 2010मध्ये बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात झालेल्या भूस्खलनच्या घटनेमुळे जवळपास 53 लोकांना जिवानिशी जावे लागले होते. 

Web Title: 100 people die in Bangladesh's landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.