पाकिस्तानमध्ये दुहेरी स्फोट, 18 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी
By admin | Published: June 23, 2017 09:14 PM2017-06-23T21:14:09+5:302017-06-23T21:15:34+5:30
पाकिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. 23 - पाकिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सीमारेषेजवळ असणा-या कुर्रम जिल्ह्यातील परचिनार परिसरात हे स्फोट झाले. वर्दळीच्या ठिकाणी एका मार्केटमध्ये हे स्फोट घडवण्यात आले. या परिसरात आदिवासींची संख्या जास्त आहे.
पहिला स्फोट अकबर खान मार्केटमध्ये झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईद आणि इफ्तारची शॉपिंग करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असतानाच हा स्फोट झाला. पहिला स्फोट झाल्यानंतर उपस्थितांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली असता दुसरा स्फोट झाला. सुरक्षा जवानांनी संपुर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला असून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.