VIDEO : फ्रान्सच्या फस्ट लेडीच्या फिगरला ट्रम्प म्हणतात...

By admin | Published: July 14, 2017 03:03 PM2017-07-14T15:03:44+5:302017-07-14T15:03:44+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत माध्यमांच्या चर्चेत आसतात.

VIDEO: The figure of France's First Lady is called trump ... | VIDEO : फ्रान्सच्या फस्ट लेडीच्या फिगरला ट्रम्प म्हणतात...

VIDEO : फ्रान्सच्या फस्ट लेडीच्या फिगरला ट्रम्प म्हणतात...

Next

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 14 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत माध्यमांच्या चर्चेत आसतात. सध्या ते फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अशी काही करामत केली आहे की ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ब्रिजिट यांच्या फिगरचं कौतुक केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभर जोरदार चर्चा सुरू आहे.
ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्या स्वगतासाठी इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या दोन्ही गालावर पॅरिस स्टाइल किस केलं. बराच वेळ ते ब्रिजिट यांचा हात हातात घेऊन उभे होते. यावेळच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या सुडौल शरीराचं कौतुक केलं. तुमची फिगर किती चांगली आहे. सुंदर!
ट्रम्प यांच्या या वक्तव्यनंतर ब्रिगिट्टी थोड्याशा खजील झाल्याचे पहायला मिळाले. ट्रम्प आणि ब्रिगिट्टी यांचा हा व्हिडिओ सध्या सोलम मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

आणखी वाचा -
मेलेनियाने पुन्हा करुन दाखवलं, ट्रम्प यांच्या "हाती" निराशा 
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे तर, पत्नी 64 वर्षांची! वर्गशिक्षिकेबरोबर केले लग्न 
डोनाल्ड ट्रम्प यांचा "तो" अवयव अगदी छोटा, सेक्सवर्करचा दावा

दरम्यान, फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती आहे. इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी यांची प्रेमकथा विलक्षण आहे. इमॅन्युअल आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केले. इमॅन्युअल 15 वर्षांचे असताना ब्रिगिट्टीबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी ब्रिगिट्टी त्यांना ड्रामा विषय शिकवायची. पहिल्या भेटीतच इमॅन्युअल ब्रिगिट्टीच्या प्रेमात पडले. दोनवर्षांनी त्यांनी आपल्या शिक्षिकेजवळ प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी ब्रिगिट्टी 42 तर, इमॅन्युअल 17 वर्षांचे होते. ब्रिगिट्टी तीन मुलांची आई होती. तरीही ब्रिगिट्टीला हे प्रेमसंबंध मान्य होते. इमॅन्युअलच्या आई-वडिलांना जेव्हा या प्रेम प्रकरणाबद्दल समजले तेव्हा त्यांनी ब्रिगिट्टीचा नाद सुटावा यासाठी इमॅन्युअलची शाळा बदलली. पण इमॅन्युअल यांनी तू कुठेही जा, मी तुझ्याजवळ परत येईल.तुझ्याशीच लग्न करेन असे आश्वासन दिले होते. इमॅन्युअल 18 वर्षांचा झाल्यानंतर ब्रिगिट्टीने रीतसर घटस्फोट घेतला. 2007 मध्ये इमॅन्युअलने ब्रिगिट्टीबरोबर लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल 30 तर, ब्रिगिट्टी 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नाला आता नऊवर्ष झाली असून दोघेही आनंदात आयुष्यात जगत आहेत. ब्रिगिट्टी यांना सात नातवंडे आहेत.

Web Title: VIDEO: The figure of France's First Lady is called trump ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.