अंकारा बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ९५

By admin | Published: October 11, 2015 11:32 PM2015-10-11T23:32:42+5:302015-10-11T23:32:42+5:30

तुर्कस्तानची राजधानी अंकारात कुर्दसमर्थकांच्या शांतता फेरीत झालेल्या दोन बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ९५ झाली आहे.

Number of deaths in Ankara bomb blast: 95 | अंकारा बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ९५

अंकारा बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ९५

Next

अंकारा : तुर्कस्तानची राजधानी अंकारात कुर्दसमर्थकांच्या शांतता फेरीत झालेल्या दोन बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ९५ झाली आहे. शनिवारी झालेल्या या बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी रविवारी हजारो लोकांनी शांतता रॅली काढली. त्यात सहभागी झालेल्या लोकांनी कुर्दविरोधकांचा घोषणा देऊन निषेध केला.
दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. तुर्कस्तानात १ नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत. शहरातील मुख्य रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटांमुळे देशात तणाव वाढला आहे. सरकारने कुर्द बंडखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. त्यामुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण बनले असताना ही घटना घडली आहे.
तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमत दावुतोल्गू यांनी २४६ जण जखमी झाल्याचे सांगितले. त्यापैकी ४८ जणांची प्रकृती गंभीर आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी या घटनेचा निषेध करताना देशाची एकता आणि अखंडतेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये रेयहानली येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत ५० जण ठार झाले होते.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या बॉम्बस्फोटांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी उभ्या केलेल्या आव्हानास आम्ही तुर्कस्तानसोबत आहोत. (वृत्तसंस्था)

Web Title: Number of deaths in Ankara bomb blast: 95

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.