कोहिनूर हिऱ्याबाबत पाक कोर्टात याचिका

By admin | Published: December 3, 2015 07:52 PM2015-12-03T19:52:51+5:302015-12-03T19:53:45+5:30

पाकिस्तानमधील लाहोर उच्च नायालयात वकील जावेद इकबाल जाफरी यांनी कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा परत आणावा म्हणून याचिका दाखल केली आहे.

Plea in Pak Court Regarding Kohinoor Diamond | कोहिनूर हिऱ्याबाबत पाक कोर्टात याचिका

कोहिनूर हिऱ्याबाबत पाक कोर्टात याचिका

Next

ऑनलाइन लोकमत

लाहोर, दि. ३ - पाकिस्तानमधील लाहोर उच्च नायालयात वकील जावेद इकबाल जाफरी यांनी कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा परत आणावा म्हणून याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असे मह्टले आहे की, ब्रिटनने महाराजा रणजितसिंहचे पणतू दलीप सिंह यांच्याकडून कोहिनूर हिरा हस्तगत केला आहे. कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी भारतही प्रयत्नशिल आहे. यामुळे, पाकिस्तानमध्ये दाखल करण्यात आलेली ही याचिका महत्त्वपूर्ण आहे. 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या १९५३ मध्ये झालेल्या राज्यरोहणावेळी त्यांच्या रत्नजडित मुकूटामध्ये कोहिनूरही जडविण्यात आला होता. १०५ कैरट वजन असलेल्या कोहिनूर हिऱ्याची किंमत अरबों रुपये आहे आणि कोहिनूर हिऱ्यावर क्वीन एलिझाबेथ यांचा काहीही हक्क नाही. कोहिनूर हा पंजाब प्रांताच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असून त्यावर येथील नागरिकांचाच अधिकार आहे,‘ असे जावेद इक्‍बाल जाफरी यांनी त्यांच्या दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
 न्यायालयाने या पार्श्‍वभूमीवर कोहिनूर हिरा पाकिस्तानमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.मध्य युगात आंद्रप्रदेश च्या गुंटूर जिल्ह्यामध्ये कोल्लूर खाणी मध्ये कोहिनूर हिरा मिळाला होता, त्यावेळी तो जगातील सर्वात मोठा हिरा म्हणून ओळखला जात होता.

Web Title: Plea in Pak Court Regarding Kohinoor Diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.