साबणाच्या पाण्याने धुवा मोबाईल

By admin | Published: December 6, 2015 03:24 AM2015-12-06T03:24:56+5:302015-12-06T03:24:56+5:30

अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती

Wash the water with the proven water | साबणाच्या पाण्याने धुवा मोबाईल

साबणाच्या पाण्याने धुवा मोबाईल

Next

टोक्यो : अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती केली आहे. हा मोबाइल केवळ वॉटरप्रूफ नसून चक्क साबणाच्या पाण्याने धुता येऊ शकणार आहे.
दिवसभर घामाने किंवा घरातल्या, कार्यालयातील धुळीमुळे मोबाइलची स्क्रीन खराब होते. त्यावरील पारदर्शक आवरणाचाही फारसा उपयोग होत नाही किंवा तो कोरड्या फडक्याने पुसण्यापलिकडे आपण काहीच करु श्कत नाही. स्वयंपाकघरातही त्यावर पाणी किंवा तेलासारखे पदार्थ उडतील म्हणून काळजी घ्यावी लागते. यासर्व प्रश्नांवर क्योसरोने डिग्नो रेफ्र नावाच्या मॉडेलद्वारे उत्तर शोधले आहे. हा मोबाइल आपल्याला वापरानंतर स्वच्छ धुता येणार आहे, महत्वाचे म्हणजे टचस्क्रीन भिजल्यावरही त्याच्या स्क्रीनवरील कळ दाबता येता येतात. ४३ अंश से. इतक्या तापमानाच्या गरम पाण्यात पडला तरीही तो चालू राहू शकतो. क्योसरोने याआधीही अत्यंत टीकाऊ उत्पादने बनविली असून, सौरऊर्जेवर चालणाऱ्या फोनचे तंत्रज्ञानही त्यांनी शोधले आहे. (वृत्तसंस्था)

अंघोळीच्या वेळेसही मीटिंग
कामाच्या व्यापात सतत गुंतलेल्या उद्योजकांना अशा फोनचा नक्कीच उपयोग होऊ शकणार आहे. मोबाईलवर सतत चालू असणाऱ्या कामामुळे मला अंघोळीलाही वेळ मिळत नाही त्यामुळे उशिरा आवरले अशी तक्रार असणाऱ्यांचीही काळजी या फोनने दूर केली आहे.
या स्मार्टफोनची किंमत ५७,४२० जपानी येन म्हणजेच ४६५ डॉलर्स इतकी असून तो कोरल पिंक, काश्मिरी व्हाईट आणि मरिन नेव्ही अशा तीन रंगात उपलब्ध आहे.

Web Title: Wash the water with the proven water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.