त्रासलेल्या वसईकरांनी उद्धाटन केलेला फ्लायओव्हर MMRDAने केला बंद

By Admin | Published: June 17, 2016 12:36 PM2016-06-17T12:36:21+5:302016-06-17T17:19:30+5:30

वसई पुर्वे - पश्चिमेला जोडणा-या फ्लायओव्हरचं वसईकरांनी स्वत: उद्घाटन केल्यानंतर एमएमआरडीएने हा फ्लायओव्हर पुन्हा बंद केला आहे

The flyovers inaugurated by the troubled Vasikar stopped the MMRDA | त्रासलेल्या वसईकरांनी उद्धाटन केलेला फ्लायओव्हर MMRDAने केला बंद

त्रासलेल्या वसईकरांनी उद्धाटन केलेला फ्लायओव्हर MMRDAने केला बंद

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
वसई, दि. 17 -  वसईकरांनी स्वत: उद्घाटन केलेला फ्लायओव्हर एमएमआरडीएने पुन्हा बंद केला आहे. गेले कित्येक दिवस वाट पाहत असूनही पुलाचं उद्धाटन होत नसल्याने वैतागलेल्या वसईकरांनी स्वत: या पुलाचं उद्धाटन केलं होतं. मात्र सर्वसामान्यांनी पुलाचं उद्घाटन केल्याचं एमएमआरडीएला रुचलं नाही. आणि त्यांनी पुन्हा एकदा फ्लायओव्हर बंद केला आहे. एमएमआरडीएच्या या भुमिकेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
वसई पुर्वेला पश्चिमेला जोडणारा फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा प्रवासाचा खूप वेळ वाचणार आहे. फ्लायओव्हर तयार असूनदेखील फक्त उद्धाटन न झाल्याने फ्लायओव्हर सुरु करण्यात आला नव्हता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं असं सांगण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री न आल्याने पुन्हा फ्लायओव्हरचा मुहूर्त लांबण्याच्या शक्यतेने वैतागलेल्या वसईकरांनी स्वत:च या फ्लायओव्हरचं उद्धाटन करुन टाकलं. 
 
वसईमध्ये वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे. जुन्या वसई ब्रीजवरुन प्रवास करताना लोकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शाळा, हॉस्पिटल तसंच कामावर जाणा-या वाहतुकीमध्येच अनेक तास घालवावे लागत आहेत. अशात हा नवीन फ्लायओव्हर त्यांची समस्या सोडवू शकतो. बुधवारी संध्याकाळी देखील अशीच वाहतूक कोंडी झाली आणि संतापलेल्या नागरिकांनी हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी सुरु केला.
 
यापूर्वीही राजकीय नेत्यांच्या वेळेच्या सोयीसाठी विविध प्रकल्प पूर्ण होऊनही उद्घाटन लांबल्याच्या व त्यामुळे नागरिकांनी स्वत:च उद्घाटन केल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईतील महापे येथला पूल असो, वांद्रे वरळी सी लिंक असो की वांद्रे येथला उड्डाण पूर असो, असं अनेकवेळा दिसून आलंय की प्रकल्प पूर्ण होऊनही तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
 
वसईमधला पूलदेखील मुख्यमंत्र्यांच्या वेळेसाठी उद्घाटन न करता ठेवण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे, तर अजून पूर्णपणे पुलाचं काम झालं नसल्याचं एमएमआरडीएचं म्हणणं आहे.
 
नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हरचं उद्घाटन फक्त राजकारण्यांसाठी खोळंबत ठेवणं योग्य वाटत का ? 
 
तुमचं मत प्रतिक्रिया रुपानं जरूर नोंदवा...
 

Web Title: The flyovers inaugurated by the troubled Vasikar stopped the MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.