26/11 पुन्हा घडू नये यासाठी..

By Admin | Published: November 27, 2014 12:37 AM2014-11-27T00:37:13+5:302014-11-27T00:37:13+5:30

26-11 ची घटना ही पहिली आणि शेवटची ठरावी यासाठी सर्व त:हेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

26/11 will not happen again. | 26/11 पुन्हा घडू नये यासाठी..

26/11 पुन्हा घडू नये यासाठी..

googlenewsNext
26-11 ची घटना ही पहिली आणि शेवटची ठरावी यासाठी सर्व त:हेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विदेशी व देशांतर्गत दहशतवाद्यांतील सहकार्याची पाळेमुळे नष्ट करण्याचा विडा सरकारी यंत्रणांनी उचलला आहे.
 
बईवरील दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे झाली आहेत. हे दहशतवादी आपल्या देशाच्या सीमेत शिरण्यात यशस्वी झाले, याचे कारण सामान्य नागरिक दहशतवाद्यांच्या कारवायांबाबत फारसे जागरूक नव्हते. तसेच आमचे तटरक्षक दलदेखील पुरेसे सावध नव्हते. पण या घटनेपासून योग्य तो बोध घेऊन आपले तटरक्षक दल अधिक मजबूत करण्यात आले आहे. नौसेना आणि तटरक्षक दल यांना समुद्रावर देखरेख करता यावी, यासाठी गुडगाव येथे कमांड कंट्रोल इंटेलिजन्स नेटवर्क स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र तटरक्षक दलाची 31 केंद्रे आणि नौसेनेची 2क् केंद्रे यांच्यात समन्वय स्थापन करण्याचे काम करीत असते. त्यामुळे यापुढे आमच्या देशाच्या समुद्री सीमेत दाखल झालेल्या कोणत्याही जहाजावर किंवा नौकांवर लक्ष ठेवणो शक्य होणार आहे. 
आपल्या देशाची सागरी सीमा 7 हजार 5क्क्  किलोमीटर लांबीची आहे. या संपूर्ण सीमेचे रक्षण करणो हे फारच मोठे काम आहे. या सीमेवर ठिकठिकाणी 47 रडार बसवण्यात आले आहेत. याशिवाय, आणखी 3क् रडार उभारण्याचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या रेठियान या कंपनीने 15 महिन्यांच्या रेकॉर्ड वेळेमध्ये ही संपूर्ण व्यवस्था सॉफ्टवेअरने जोडण्याचे काम केले आहे. त्यात ऑप्टिकल फायबर आणि सॅटेलाईट यांचाही वापर करण्यात आला आहे. या प्रणालीवर 453 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे आपली संरक्षण क्षमता उत्तम प्रतीची झाली आहे. या यंत्रणोमुळे संपूर्ण सागरी सीमेवर चालणा:या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणो शक्य होणार आहे. तसेच इथे मिळणारी माहिती अन्य केंद्रांना पाठवून त्यांची मदत घेणो सुलभ होणार आहे. मुंबईवर झालेल्या 26-11च्या हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी एकीकृत व्यवस्था अमलात आणली. ही व्यवस्था आता उत्तम त:हेने काम करू लागली आहे. ती  देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग आहे. 
हैदराबाद येथे अटक करण्यात आलेल्या खालिद मोहम्मद याच्याकडून जी माहिती मिळाली, त्यावरून   पाकिस्तानकडून आपल्या देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी तारिके-ए-तालिबान या संघटनेचा वापर करण्यात येत असून, त्या संघटनेने भारतामध्ये आपली केंद्रे स्थापन केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अटकेमुळे बरद्वान येथे झालेल्या स्फोटाचे संबंध दहशतवाद्यांशी कसे जुळले आहेत हे समजू शकले. याशिवाय, भारत-पाक यांच्यादरम्यान चालविल्या जाणा:या समझौता एक्स्प्रेसमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशीही माहिती मिळाली आहे. ही माहिती  इंटेलिजन्स ब्युरोने जाहीर केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे यात्रेकरू सतर्क झाले असून, अनेकांनी आपले प्रवासाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातून पाठवण्यात आलेला स्फोटकांचा मोठा साठा जम्मू काश्मीरमध्ये जप्त करण्यात आला. भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडचे कोअर कमांडर जनरल सुब्रता सहा यांनी सांगितले की, 2क्14 सालात पाकिस्तानातून भारतीय सीमेत प्रवेश करणा:या 129 दहशतवाद्यांना  पकडण्यात आले. तसेच 86 दहशतवादी चकमकीत ठार झाले. पाकिस्तानातून आयईडी या स्फोटकांचा साठा भारतात आणणो शक्य झाल्यामुळे सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक  करण्यात आली आहे. 
पोलीस, रॉ,  इंटेलिजन्स ब्युरो, सैन्याचा  इंटेलिजन्स ब्युरो आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांना जी माहिती मिळते, त्याचा संबंध एकमेकांशी जोडून मगच एखाद्या श्हरात रेड अलर्ट जाहीर करण्यात येतो.  केवळ रेड अलर्ट जाहीर करून या संस्था थांबत नाहीत, तर अतिरेकी संघटनांचा संबंध कुणाकुणाशी जुळला आहे, याचा शोध घेण्याचे काम अहोरात्र सुरू असते. ही माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करण्यात येत नाही; पण हिचा उपयोग सामान्यांचे रक्षण करण्यासाठी होत असतो. 
या सर्व तपास संस्था आपले काम पार पाडीत असतात. पण,  लोकांचीही काही जबाबदारी आहे आणि 
त्यांनी ती पार पाडायला हवी. एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचालींची माहिती तपास यंत्रणोला 
देणो हे नागरिकांचे कर्तव्य ठरते. ते त्यांनी न भीता 
पार पाडायला हवे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी 
विशेष खबरदारी घ्यायला हवी. इंटेलिजन्सला खब:यांकडून माहिती मिळत असते. हे खब:याचे काम नागरिकही पार पाडू शकतात. कधीकधी अतिरेकी संघटना पोलिसांना फसवण्यासाठी पुरावे सोडून 
नाहीशा होतात. त्यांचा हेतू अतिरेक्यांचा खरा उद्देश लपवण्याचा असतो. आपल्या देशातील लहान गावे संवेदनशील आहेत. तिथूनच दहशतवादाला खतपाणी घालण्यात येते. 
प्रत्येक दहशतवादी हा आत्मघाती हल्ला करू शकतो असे नसते. पण पाकिस्तानातील एका दहशतवाद्याने वाघा सीमेवर आत्मघाती स्फोट घडवून 6क् लोकांचे प्राण घेतले, ही गोष्ट विसरता येणार नाही. अशा त:हेचे दहशतवादी पासपोर्ट न घेता भारतात शिरून आत्मघाती हल्ले करू शकतात याची जाणीव ठेवून पुरेसे जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. नौसेना आणि तटरक्षक दल यांनी परस्पर समन्वय साधण्याचे काम पूर्ण केले आहे. तसे अंतर्गत सुरक्षिततेसाठी नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड सुरू करण्यात आले आहे. तसेच नॅशनल काऊंटर टेररिजम सेंटरची रूपरेषा आखण्याचे काम सुरू आहे. हे केंद्र देशात घडणा:या दहशतवादी कारवायांची नोंद ठेवील. तसेच त्यांना मिळणारी माहिती अन्य संस्थांना पुरवील. अशा त:हेने देशाच्या संरक्षणाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने केले जाणार आहे. 26-11 ची घटना ही त्या त:हेची पहिली आणि शेवटची ठरावी यासाठी सर्व त:हेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विदेशी दहशतवाद्यांना देशांतर्गत दहशतवाद्यांकडून सहकार्य मिळत असते. या सहकार्याची पाळेमुळे नष्ट करण्याचा विडा सरकारी यंत्रणांनी उचलला आहे.
 
 सारंग थत्ते 
  सेवानिवृत्त कर्नल

 

Web Title: 26/11 will not happen again.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.