दहावीचा निकाल ९४.७७ टक्के
By Admin | Published: June 9, 2015 05:45 AM2015-06-09T05:45:41+5:302015-06-09T05:45:41+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा शहराचा एकूण निकाल ९४.७७ टक्के लागला.
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा शहराचा एकूण निकाल ९४.७७ टक्के लागला. एकूण १७ हजार ४४ पैकी १६ हजार १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १६१ पैकी ६१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एकला आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. शहरातून १६ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी मार्च महिन्यात झालेली दहावीची परीक्षा दिली. नियमित १६ हजार ३७६ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८,३९३ मुले व ७,४८१ मुली उत्तीर्ण झाले. पुनपरिक्षार्थी ६६८ पैकी २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शहरातील एकूण ६१ शाळाचा निकाल १०० टक्के लागला. त्यातील ३ शाळा महापालिकेचा आहेत. मावळ तालुक्यातील एकूण ४ हजार ७१४ पैकी ४ हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी २ हजार ३७५ मुले व २ हजार ३२५ मुली उत्तीर्ण झाल्या.
महापालिका शाळा निकालात घट
महापालिकेच्या फुगेवाडी, केशवनगर आणि क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर एकूण १८ शाळांचा निकाल ९१.२५ टक्के आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण निकालात २ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी ९३.३८ टक्के निकाल लागला होता. भोसरी, कासारवाडी, पिंपरीगाव, लांडेवाडी, वाकड, आकुर्डी, निगडी या शाळांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. यंदा तीन शाळांतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी केवळ क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचा निकाल १०० टक्के होता. यंदा ही संख्या तीनवर पोहचली आहे.
महापालिका शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. भोसरी
विद्यालय : ९१.७ टक्के, संत
तुकारामनगर विद्यालय : ९२.६८, कासारवाडी विद्यालय : ९१.५२, फुगेवाडी विद्यालय : १००, खराळवाडी विद्यालय : ९३.५८, नेहरुनगर : ८८.४०, पिंपरी गाव विद्यालय : ६६.६, काळभोरनगर विद्यालय : ९१.५३, लांडेवाडी विद्यालय : ८६.८८, क्रीडा प्रबोधिनी विद्यालय : १००,
पिंपळे सौदागर विद्यालय : ९०.५०,
पिंपळे गुरव विद्यालय : ९५.८५, वाकड विद्यालय : ७६.८, थेरगाव विद्यालय : ९५.९३, केशवनगर विद्यालय : १००, आकुर्डी विद्यालय : ९४.२, निगडी विद्यालय : ८९.६, रुपीनगर विद्यालय : ९७.३२.(प्रतिनिधी)