राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

By admin | Published: February 7, 2016 01:19 AM2016-02-07T01:19:35+5:302016-02-07T01:19:35+5:30

मागील १० वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत आहे ....

The demand of the demand of the President asked the President | राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

Next

पहेला : मागील १० वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत आहे व आमच्या पदरी निराशाच पडत असल्याने शेवटी कंटाळून कंत्राटी वाहन चालक जितेंद्र डोंगरे यांनी इच्छामरणासाठी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विनंती केली आहे.
सदर कंत्राटी वाहन चालक हा भंडारा जिल्ह्यातील व मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील रहिवासी असून ते सन २००६ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कंत्राटी वाहन चालक व रोजंदारी तत्वावर कार्यरत आहे. सदर नियुक्ती रोजगार व स्वयंरोजगारच्या अंतर्गत करण्यात आली होती. तिथे दहा ते पंधरा लोकांची कमेटी नेमण्यात आली होती. त्यामध्ये गाडीची ट्रायल व पेपर आणि तोंडी परीक्षा घेऊन एकूण चालक या पदासाठी १७ लोकांची निवड करण्यात आली होती.
त्यामध्ये जितेंद्र डोंगरे हा वाहनचालक सुद्धा होता. त्यानंतर सदर वाहनचालकाची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी (मोठी) येथे करण्यात आली. तेव्हा त्यांना फक्त २६५० रुपये एवढ्याशा मानधनावर २४ तास सेवा देणे बंधनकारक होते. तरीसुद्धा सदर वाहन चालक मुकाट्याने २४ तास सेवा देत होते.
सन २००७ मध्ये डोंगरे यांची बदली प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे करण्यात आली. काही काळानंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले होते. नंतर आय.पी.एच.एस. मध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्यात वाहन चालक पदाकरिता वृत्तपत्रात जाहिरात दिली. त्यानुसार डोंगरे यांनी अर्ज केला. त्यानुसार डोंगरे यांनी अर्ज केला व त्यात त्याची पुन्हा निवड करण्यात आली. काही काळानंतर मे.बी. व्ही.जी.प्रा.लि. पुणे यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला तेव्हा त्यांचेकडे दोन वर्षे वाहन चालक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रोजंदारी या पदावर कार्यरत आहे. (वार्ताहर)

Web Title: The demand of the demand of the President asked the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.