वर्षभरात एसटी अपघातात नऊ जणांचा मृत्यू
By admin | Published: January 25, 2016 12:24 AM2016-01-25T00:24:28+5:302016-01-25T00:24:28+5:30
एसटी ही सामान्य माणसांची जीवनवाहनी ठरली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो.
गंभीर, किरकोळ ४७ अपघात : रस्ता सुरक्षा सप्ताह, सुरक्षित सेवेची एसटीची हमी
संदीप मानकर अमरावती
एसटी ही सामान्य माणसांची जीवनवाहनी ठरली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी अपघाताची टक्केवारी जरी कमी असली तरी जानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षात एसटी अपघातात ९ जण दगावले आहे. यामध्ये २७ गंभीर अपघात घडले, तर १३ किरकोळ अपघात घडले आहेत, असे एकूण ४७ अपघात घडले आहेत.
सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. अपघात टाळण्यासाठी चालकांसाठी अनेक शिबिरे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक व विभागीय कार्यालयाच्यावतीने राबविण्यात आले. एसटी अपघातात अमरावती आगारात २, वरुडमध्ये २, मोर्शी २, चांदूरबाजार १ व परतवाडा आगारात १ मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
एसटी कुणाला देते अपघात 'क्लेम' ?
जर एखाद्या व्यक्तीचा एसटी अपघातात मृत्यू झाला असेल तर मोठ्या वाहनाला मदत देत नाही. पण मृताच्या वारसाने 'क्लेम' केल्यास तीन लाखांपर्यंत महामंडळाच्यावतीने मदत देण्यात येते. पायी चालणारा प्रवासी, सायकलस्वार, बैलगाडीस्वार, कटलारिक्षा, चालक असा व्यक्ती एसटी अपघातात सापडला असता तो क्लेमसाठी पात्र ठरतो.
दोषी चालकावर निलंबनाची कारवाई
अपघातात एसटीचा चालक दोषी असेल तर या केसचा निकाल लागेपर्यंत त्याला निलंबित करण्यात येते. त्याला जबाबदार असेल तर आरोपपत्र दाखल करण्यात येते. अपघातानंतर दोषी नसेल व चालक कामावर रुजू होताना उजळणी प्रशिक्षण शिबिर राबवून त्यांना कर्तव्यावर पाठविण्यात येते.