एक टास्क अनेक समस्या
By admin | Published: July 23, 2015 06:08 PM2015-07-23T18:08:59+5:302015-07-23T18:08:59+5:30
दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची
Next
>- प्रथमेश मुरकुटे
दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची आस लावून बसलेले लोक असं काहीतरी चित्र कायम डोळ्यासमोर असायचं. मुंबईमधील सीमेंटच्या जंगलातून ‘ख:या’ दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल या आशेने मी या मोहिमेत सहभागी झालो. जातानाच आम्हा 6-7 जणं खाऊच्या बॅगा भरून मुंबईहून नाशिककडे निघालो.
दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्हीही खरंतर नैसर्गिक आपत्तीच. पण मग दुष्काळाच्या नशिबी महापूर निवारणासाठी मिळतो इतका निधी आणि अतिवृष्टीइतकी प्रसिद्धी याचाही दुष्काळ का? - या प्रश्नांनी सुरू झालेलं ट्रेनिंग दुष्काळाचा विचार आणि अभ्यास करायला नवीन डायमेन्शन देत गेलं. दुष्काळ मोजण्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स कोणते कोणते असू शकतील याचा अभ्यास करत दुष्काळ कसा पाहायचा, शोधायचा आणि मोजायचा याचा अभ्यासही आम्ही केला. एकदा हे इंडिकेटर्स समजले की मग कोणत्या उपायांचा आधार घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल याचा विचार करणं आणि समजून घेणं थोडं सोपं झालं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन हा यात बराच मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले करू शकतं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन हे ब:यापैकी सोपं आणि कमी खर्चिक काम आहे असं काहीसं लक्षात आलं. रोजगार हमी योजनेमधून तर बरीच पाणी व्यवस्थापनाची काम होऊ शकतात असंही रोहयोसंबंधित घेतलेल्या सत्रत समजलं.
मग दुष्काळ म्हणजे पाणी उपलब्धता कमी असणं आणि मग उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन करणं हे ढोबळमानानं लक्षात आलं. पण मग हे दुष्काळग्रस्त गावांमध्ये का केलं नसेल लोकांनी, असा प्रश्न सतावायला लागला.
डोक्यावर 2-3 हंडे घेऊन निघालेल्या स्त्रियांनी, मोठे मोठे ॉरेल वाहून आणणा:या दुबळ्या बैलांनी आणि बैलगाडीच्या मागे निरागसपणो धावणा:या लहानग्यांनी पुढच्या रविवारी आमचं गावात स्वागत केलं. 2-3 किमीवर धरण होतं, पण गावाला प्यायला पाणी मिळत नव्हतं. लोकांना 3-4 किलोमीटर चालत जाऊन प्यायला पाणी आणावं लागतं. गावक:यांशी गप्पा मारत गावाची ओळख वाढवण्याचा आणि गावाचा नकाशा तयार करण्याचं टास्क आम्ही हाती घेतलं होत. डोंगराच्या पायथ्याशी असलेली कुरुंदवाडी आणि आंबेवाडी या दोन गावांमध्ये जाऊन हे टास्क पूर्ण करायचं होतं. या टास्कच्या निमित्ताने गावक:यांशी खूप गप्पा मारल्या. सर्वांनी पाण्याची समस्या असल्याचं आणि फक्त पावसाळ्यातच शेती करत असल्याचं आवर्जून सांगितलं. एका पिकातून येणा:या उत्पन्नातून आणि नंतर रोहयोची व बाहेरची कामे करून दिवसामागून दिवस नीट जाताहेत यात त्यांना आनंद होता. त्यांची शिकली सवरलेली मुले कामासाठी मुंबई, पुणो, सोलापूर या शहरांमध्ये स्थलांतरित झाली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या शेतांचे पण छोटे छोटे तुकडे झाले होते. एकंदरीत शेती करणं हे कालबाह्य होत चाललंय की काय असं वाटलं काही लोकांशी बोलून.
आता पावसाळ्यात गावामध्ये पाऊस किती पडला हे गावातील लोकांबरोबर मोजून त्यांच्या शिवारातून किती पाणी वाहून गेलं यावर त्यांच्याशी पावसाळ्यानंतर चर्चा करावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणोकरून या पावसाळ्यानंतर तरी गावात पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील अशी आशा करतोय.